पाेलिस पती-पत्नीशी झालेल्या वादानंतर महिलेचा हृदयविकाराने मृत्यू

पाेलिस दाम्पत्यावर कारवाई करण्याची मागणी

    दिनांक :01-Apr-2026
Total Views |
निल कांबळे
नागपूर,
Woman dies after argument नागपूर शहर पाेलिस दलात कार्यरत पाेलिस अंमलदार महिला व ग्रामीण पाेलिस दलात असलेला तिचा पती यांचा शेजारी राहणाèया महिलेशी वाद झाला. त्या वादानंतर त्या महिलेने नवीन कामठी पाेलिस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, पाेलिस पती-पत्नीने दिलेल्या मानसिक त्रासामुळे त्या महिलेची प्रकृती बिघडली. तिचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला. या प्रकरणी नवीन कामठी पाेलिसांनी तुर्तास आकस्मिक मृत्यूची नाेंद केली आहे. मृत महिलेच्या नातेवाईकांनी शेजारी राहणा-या पाेलिस दाम्पत्यावर कठाेर कारवाईची मागणी केली आहे. त्रिशीला मुकेश खाेब्रागडे (47) असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे.
 
 


df56 
 
 
मुकेश खाेब्रागडे हे मध्य प्रदेशातील आमला येथे एअर ाेर्समध्ये कार्यरत आहेत. त्यामुले त्रिशीला या आपल्या दाेन मुलींसह न्यू येरखेडा परीसरात राहतात. त्यांच्या घराशेजारीच नागपूर पाेलिस आयुक्तालयात कार्यरत असलेले सपना माटे (40) आणि ग्रामीण पोलिस दलात कार्यरत त्यांचे पती राहुल रंगारी राहतात. रविवारी रात्री 8 वाजता सपना माटे घरी आल्या असता, त्रिशीला खाेब्रागडे यांनी घरासमाेर बांधलेल्या सिमेंटच्या ओट्यामुळे वाहन नेण्यास अडचण निर्माण झाल्याची तक्रार केली. यावरून दाेन्ही कुटुंबात जाेरदार शाब्दिक चकमक उडाली. वादाचे स्वरूप वाढल्याने दाेन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध पाेलिस तक्रार करण्याची धमकी दिली. रात्री 9 वाजता सुमारास त्रिशीला खाेब्रागडे यांनी नवीन कामठी पाेलिस स्टेशन गाठून सपना माटे आणि राहुल रंगारी या पाेलिस दाम्पत्यांविरुद्ध तक्रार दिली. वरिष्ठ पाेलिस निरीक्षक महेश आंधळे यांनी चाैकशीचे आश्वासन दिल्यानंतर त्या रात्री 10 वाजता घरी परतल्या. मात्र, मानसिक तणावामुळे त्यांचा रक्तदाब अचानक वाढला आणि त्यांची प्रकृती खालावली. त्यांना तातडीने कामठी-कळमना मार्गावरील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान रात्री 11:30 च्या सुमारास त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला.
 
 
पाेलिस दाम्पत्यांवर कारवाईची मागणी
त्रिशीला यांच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी पाेलिस दाम्पत्याच्या त्रासामुळेच त्रिशीला यांचा मृत्यू झाल्याचा आराेप करत पाेलिस स्टेशनमध्ये गर्दी केली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते. ‘पाेलीस विभागात असल्याने हे दाम्पत्य त्रास देत हाेते आणि त्यांच्याशी झालेल्या वादामुळेच त्रिशीला यांचा जीव गेला,‘ असा आराेप नातेवाईकांनी केला आहे. नवीन कामठी पाेलिसांनी मुकेश खाेब्रागडे यांच्या तक्रारीवरून तूर्तास आकस्मिक मृत्यूची नाेंद केली.
 
 
पाेलिस अंमलदार दाम्पत्य आणि शेजारी राहणा-या त्रिशीला यांच्यात शाब्दीक वाद झाला हाेता. वादानंतर त्रिशीला यांनी पाेलिस ठाण्यात तक्रार दिली हाेती. यादरम्यान, त्रिशीला यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नाेंद केली आहे. पुढील तपास सुरु आहे.
- महेश आंधळे, वरिष्ठ पाेलीस निरीक्षक, नवीन कामठी.