कुस्तीला सुवर्णकाळ येणार : सुधीर मुनगंटीवार

देवळीत ग्रीकोरोमन महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन

    दिनांक :01-Apr-2026
Total Views |
देवळी,
Sudhir Mungantiwar कुस्तीला लोकमान्यता आहे, मात्र राजमान्यता आर्थिक शतीच्या माध्यमातून दिली तर महाराष्ट्राच्या मातीतल्या रांगड्या खेळाला अधिक बळ मिळेल. भविष्यात कुस्तीला पुन्हा सुवर्णकाळ येईल, असा विश्वास माजी अर्थमंत्री तथा बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यत केला.
 

wrestling Maharashtra Kesari competition, Greco Roman wrestling Maharashtra, Sudhir Mungantiwar statement wrestling futur 
विदर्भाच्या क्रीडा इतिहासात दुसर्‍या ग्रीकोरोमन महाराष्ट्र केसरी किताब लढत व वरिष्ठ गट राज्यस्तरीय अजिंयपद कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन देवळी येथे मोठ्या थाटात पार पडले. विदर्भ केसरी रामदास तडस इनडोअर स्टेडियम, स्व. दत्ता मेघे क्रीडा नगरीत रंगलेल्या या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. समीर कुणावार तर स्वागताध्यक्ष आ. राजेश बकाने, स्पर्धेचे आयोजक व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खा. रामदास तडस, आ. दादाराव केचे, मदन चावरे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, नगराध्यक्ष किरण ठाकरे, उपाध्यक्ष राहुल चोपडा, माजी नगराध्यक्ष शोभा तडस, मिलिंद भेंडे, नगरसेवक बंडू जोशी, अनिल कारोटकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, कुस्ती हा केवळ खेळ नसून शती, शिस्त आणि संयमाचे प्रतीक आहे. देशाला मिळालेल्या ऑलिम्पिक पदकांमध्ये कुस्तीचा मोठा वाटा आहे. क्रीडा क्षेत्राला १ हजार कोटी दिले तर आरोग्य विभागाचा २ हजार कोटींचा निधी वाचवू शकतो व देशाचे आरोग्यही सुधारेल. क्रीडा क्षेत्रासाठी डीपीडीसी, महानगरपालिका, जिपच्या अर्थसंकल्पात विविध स्पर्धांसाठी निधीचे आरक्षण करू शकलो तर गावागावात खेळाडू निर्माण होऊ शकतात, असेही ते म्हणाले. रामदास तडस खासदार असताना त्यांना क्रीडा मंत्री होण्याची संधी मिळाली असती तर क्रीडा क्षेत्राचे सोने झाले असते, असेही ते म्हणाले.
आ. कुणावार म्हणाले, कुस्तीच्या माध्यमातून युवकांना प्रेरणा मिळते. आज मैदाने ओस पडून खेळ मागे पडत आहेत. मजबूत व सशत पिढी घडवण्यासाठी क्रीडा संस्कृती आवश्यक असल्याचे सांगून या स्पर्धेसाठी आमदार निधीतून १० लाख रुपयांचा निधी जाहीर केला.
रामदास तडस यांनी Sudhir Mungantiwar  विदर्भातील कुस्तीचा विकास हा आपला ध्यास असल्याचे सांगितले. पश्चिम महाराष्ट्राप्रमाणेच विदर्भातही कुस्तीला चालना मिळावी, येथील खेळाडूंनी ऑलिम्पिकपर्यंत मजल मारावी हा आमचा प्रयत्न आहे. देवळीत होत असलेली ही स्पर्धा विदर्भासाठी ऐतिहासिक असल्याचे सांगितले. आ. बकाने यांनी सहभागी मल्लांचे स्वागत करीत अनेक वर्षांची महाराष्ट्राची कुस्ती परंपरा देवळीत जपल्याबद्दल रामदास तडस यांचे अभिनंदन केले.संचालन शुभांगी कुर्जेकर तर आभार प्रदर्शन रवींद्र कारोटकर यांनी केले. यशस्वी आयोजनासाठी उमेश कामडी, रवी कारोटकर, अंकित टेकाडे, सौरभ कडू, प्रकाश कारोटकर, नंदू वैद्य यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.