अभिजित सावंत यांच्या गाण्यांनी जिंकली प्रेक्षकांची मनं

यवतमाळ महोत्सवाचा दिमाखात समारोप

    दिनांक :01-Apr-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Yavatmal Festival concludes in style राज्य शासनाच्या विविध जिल्हास्तर विभागांच्यासंयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘यवतमाळ महोत्सव 2026’ दिमाखात समारोप करण्यातआला. या महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात इंडियन आयडॉल फेम प्रसिद्ध गायक अभिजित सावंतयांच्या गीतगायनाने रंगत आणली. या कार्यक्रमाला नगर परिषद अध्यक्ष अ‍ॅड. प्रियदर्शनीउईके, जिल्हाधिकारी विकास मीना, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, जिल्हा अधीक्षक कृषीअधिकारी मनोज ढगे, प्रकल्प संचालक आनंद पिंगळे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड , जिल्हा ग्रंथालय अधिकारी कविता महाजन, तहसीलदार डॉ. योगेश देशमुख, मुख्याधिकारी शुभम क्यातमवार प्रामुख्याने उपस्थित होते.
 
 
 
567
 
 
या यवतमाळ महोत्सवात भरविण्यात आलेल्या कृषी प्रदर्शन, उमेदच्या समृद्धी मिनी सरस प्रदर्शनी आणि माविमच्या नवतेजस्विनी प्रदर्शनीत कालपयरत जवळपास अडीच कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी समारोप भाषणात दिली. या महोत्सवात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ , पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट ́ राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, महिला आर्थिक विकास महामंडळ या विभागामार्फत कृषी उत्पादक कंपन्या, ग्रामीण भागातील महिला स्वयं सहायता गटांचे 300 पेक्षा जास्त प्रदर्शन स्टॉल्स व 60 पेक्षा जास्त फूड स्टॉल्स आणि पशु दालन उभारण्यात आले होते या महोत्सवादरम्यान आयोजित स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणा-या स्टॉल्सधारकांचा जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सुरुवातीला बासरीवादक आकाश सैतवाल यांनी पारंपरिक बासरीने गीतांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रसिद्ध गायक अभिजित सावंत यांचा जिल्हाधिकारी विकास मीना यांनी सत्कार केला.