तभा वृत्तसेवा
उमरखेड
Yavatmal Stray Dog Danger शहरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा त्रास प्रचंड वाढला असून नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. बुधवार, 1 एप्रिल रोजी शहरात 30 जणांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याने उपजिल्हा रुणालयामध्ये रु2ण व नातेवाईकांची एकच गर्दी झाली होती. 26 रुणांना रेबीजचे इंजेक्शन देऊन घरी पाठवण्यात आले तर 4 रुणांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आले आहे. लहान मुले व वयोवृद्धांवर कुत्र्यांचे हल्ले वाढल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी कुत्र्यांनी नागरिकांवर झडप घालून जखमी केल्याच्या घटना समोर येत असून शासकीय रुणालयात ‘त्या’ रुणांची संख्या वाढली आहे. नागरिकांनी याबाबत वारंवार नगर परिषदप्रशासनाकडे तक्रारी केल्या असतानाही अद्याप

ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आमच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार, अशी विचारणा नागरिकांकडून होत आहे. काही महिन्यांपूर्वी नगर परिषदेकडून भटक्या कुत्र्यांचे निजरतुकीकरण करण्याची मोहीम राबवण्यात आली होती. मात्र ही मोहीम प्रभावी ठरली नसल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून स्पष्ट होत आहे. उलट शहरातील विविध भागांत कुत्र्यांची संख्या वाढतच असल्याने नागरिकांना रोजच्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. शहरातील मुख्य रस्ते, तसेच विविध प्रभागांतील छोट्या-छोट्या गल्लीबोळांमध्ये कुत्र्यांचे टोळके तयार होत असून हे कुत्रे अचानक नागरिकांवर हल्ला करत आहेत. विशेषत... शाळेत जाणाèया लहान मुलांना व एकटे फिरणाèया वयोवृद्धांना याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, कुत्र्यांमुळे पसरणाèया आजारांबाबत जनजागृतीसाठी प्रशासनाने पूर्वी फलक लावले, मोहीमा राबवल्या. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीत मोठी तफावत दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाने केवळ कागदी उपाययोजना न करता तातडीने प्रभावी कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांवर तत्काळ नियंत्रण आणून नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
कुत्रे पकडण्याची निविदा काढणार शहरातील भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्याकरिता दोन दिवसांनी कुत्रे पकडण्याची निविदा काढण्यात येणार आहे. सात दिवसांत कुत्रे पकडणारे पथक शहरात दाखल होऊन मोकाट कुत्र्यांचे निजरतुकरण करून त्यांना शहराच्या बाहेर नेऊन सोडण्यात येईल.
डॉ. अजय कुरवाडे
नगर परिषद मुख्याधिकारी, उमरखेड
शहरात एकाच दिवशी कुत्र्यांनी तीस जणांना चावा घेतल्याची घटना इतिहासात नोंद करण्यासारखी आहे. येथील उपजिल्हा रु1⁄2णालयात उपचारासाठी रुणांनी धाव घेतली असून त्यापैकी चार अतिगंभीरांना पुढील उपचारार्थ नांदेड येथे पाठवण्यात आले आहे. तर 26 रु1⁄2णांना रेबीजची लस देऊन उपचार करून घरी पाठवण्यात आले आहे. तसेच एआरएस मेडिसिन येथे उपलब्ध नसल्याने जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवण्यात आले आहे.
डॉ. किशोर कपाळे
वैद्यकीय अधिकारी, उमरखेड