98 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास
वणी,
शहरानजीक असलेल्या चिखलगाव परिसरात Theft of treesझाडांची मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. अज्ञात चोरट्यांनी तब्बल 98 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वणीच्या लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी वणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून भान्यासं 303 (2) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Theft of trees शिक्षण प्रसारक मंडळाच्या मालकीची चिखलगाव यवतमाळ मार्गावर लालपुलिया परिसरात सुमारे 32 एकर जागा आहे. या ठिकाणी सुमारे 6 वर्षांपूर्वी लावण्यात आलेली 14 बांबूची झुडपे (अंदाजे 210 बांबू) तसेच 10 सुबाभळीची झाडे होती. 17 मार्च रोजी संध्याकाळी प्राचार्य डॉ. खानझोडे जागेचे मोजमाप करण्यासाठी तेथे गेले असता, संबंधित झाडे पूर्णपणे कापून नेल्याचे निदर्शनास आले. चोरी गेलेल्या बांबूंची किंमत सुमारे 73 हजार 500 रुपये तर सुबाभळीच्या झाडांची किंमत सुमारे 25 हजार रुपये असून एकूण नुकसान 98 हजार 500 रुपये आहे. या प्रकरणाची नोंद मंगळवार, 7 एप्रिल रोजी करण्यात आली असून पुढील तपास वणी पोलिस ठाण्याचे नीलकमल भोसले करीत आहेत. या घटनेनंतर शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. काही ठिकाणी बांबू विक्रीबाबत संशय व्यक्त केला जात आहे.