अकोला- वाशीम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षपदी राम ठाकरे
दिनांक :10-Apr-2026
Total Views |
सहकार क्षेत्रात ठाकरे घराण्याचे निर्विवाद वर्चस्व कायम
मंगरूळनाथ,
Akola-Washim District Central Cooperative Bank राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्या अकोला - वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी रामेश्वर सुभाष ठाकरे यांची अविरोध निवड झाली असून, यामुळे वाशीम जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात आनंदाचे वातावरण पहावयास मिळाले आहे. तर माजी मंत्री तथा जिल्ह्यातील वजनदार नेते सुभाष ठाकरे यांचे सहकार क्षेत्रातील आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले असून, मंगरूळनाथ तालुयाला पहिल्यांदाच हा बहुमान मिळाल्याचा आनंद व्यक्त होत आहे.
Akola-Washim District Central Cooperative Bank अकोला-वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अकोला येथील सभागृहात ९ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदी डॉ. जयराज कोरपे तर उपाध्यक्षपदी रामेश्वर ठाकरे यांची एकमताने अविरोध निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या अकोला-वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलचा घवघवीत विजय झाला होता. २१ संचालक संख्याबळ असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत यामध्ये अकोला व वाशीम या दोन्ही जिल्ह्यातील संचालक मंडळांचा समावेश आहे. ९ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते डॉ. जयराज कोरपे यांची अध्यक्षपदी तर रामेश्वर ठाकरे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
Akola-Washim District Central Cooperative Bank सहकार नेते यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनात माजी मंत्री सुभाष ठाकरे मंगरूळनाथ मतदारसंघात सहकार क्षेत्राची बाजू भक्कम करून शेतकरी शेतमजुरांना न्याय दिला, त्यांच्यापासून सुरू असलेला सहकाराचा वारसा रामेश्वर ठाकरे यांच्या निवडीने अधिक भक्कम केला आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या मार्गदर्शनात आपण काम करणार असल्याचे मत रामेश्वर ठाकरे यांनी व्यक्त केले.