अखेर, रामनगरवासीय झाले हकदार मालक

    दिनांक :10-Apr-2026
Total Views |
पालकमंत्री डॉ. भोयर यांच्याहस्ते लीज भुखंडधारकांना फ्रिहोल्ड प्रमाणपत्र
 
वर्धा, 
येथील रामनगर परिसरातील नागरिक ज्या घरात राहत होते. त्याचा मालकी हक मात्र त्यांच्याकडे नव्हता. त्यामुळे त्यांना घरासंदर्भात कोणतेही व्यवहार करता येत नव्हते. त्यांना त्या जागेचा मालकी हक मिळावा यासाठी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर प्रयत्नरत होते. त्या प्रयत्नांना यश आले असुन आज शुक्रवार १० रोजी पालकमंत्री डॉ. भोयर यांच्याहस्ते लीज भुखंडधारकांना Allotment of freehold certificates फ्रिहोल्ड प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
 
 
pankaj
 
यावेळी ना. डॉ. भोयर म्हणाले की, रामनगरवासियांकरिता ऐतिहासिक दिवस आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला भूखंडांच्या नूतनीकरणाचा आणि मालकी हक्काच्या प्रमाणपत्रांचा प्रश्न मार्गी लागला. रामनगरवासियांना मालकी हक्काचा आधार मिळाला, असे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले. नगाजी महाराज देवस्थान येथे नपच्यावतीने रामनगर वासियांना लीज भुखंड धारकांना फ्रिहोल्ड प्रमाणपत्राचे वाटप प्रसंगी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर बोलत होते. नगराध्यक्ष सुधीर पांगूळ, उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, मुख्याधिकारी विजय देशमुख, नगरसेवक संतोष ठाकूर, निलेश किटे, राखी पांडे, प्रियंका खंगार आदी उपस्थित होते.
 
 
 
Allotment of freehold certificates  रामनगर परिसरातील भूखंडांची लीज १९३० पासून सुरू झाली होती. ती संपल्यानंतर अनेक तांत्रिक अडचणी, कागदपत्रांची कमतरता आणि कायद्यातील तरतुदींअभावी नागरिकांना मालकी हक्क मिळण्यात अडथळे येत होते. ही समस्या सोडवण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विशेष मंजुरी देण्यात आली. राज्य मंत्रिमंडळाने ऐतिहासिक निर्णय घेत नाममात्र दरात मालकी हक्क देण्याचे धोरण निश्चित केले असल्याचे पालकमंत्री डॉ. भोयर म्हणाले. राज्य सरकारने अत्यंत सकारात्मक पाऊल उचलत कोणत्याही जाचक अटी न ठेवता रामनगर लीज भुखंडधारकांचे फ्रीहोल्ड करण्याचा निर्णय घेतला. या कामासाठी कोणत्याही नागरिकाला कोणालाही एक पैसाही देण्याची गरज नाही. सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली जात आहे. नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळणे हे भाग्याचे असल्याचेही पालकमंत्री डॉ. भोयर म्हणाले. रामनगरच्या या विकासामुळे शहराच्या प्रगतीला एक नवी दिशा मिळेल. नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि नगरपालिकेच्या संपूर्ण टीमचे कौतुक पालकमंत्री डॉ. भोयर यांनी यावेळी केले. नगराध्यक्ष सुधीर पांगूळ, उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, माजी नगराध्यक्ष संतोष ठाकूर यांनीही मनोगत व्यत केले.