समृद्धी महामार्गावर रुग्णवाहिकेची ट्रकला धडक

    दिनांक :10-Apr-2026
Total Views |
तीन जन जखमी
 
कारंजा लाड, 
Ambulance hits truck समृद्धी महामार्गावर १० एप्रिल रोजी पहाटे झालेल्या रुग्णवाहिका आणि ट्रकच्या धडकेत ट्रक चालकासह तिघांना गंभीर दुखापत झाल्याची घटना समोर आली आहे. बप्पी रॉय वय ४१, रतन बर्मन वय ३५ रा. पश्चिम बंगाल आणि रवींद्र जाधव वय ५० रा.नाशिक अशी जखमींची नावे असून, हा अपघात पहाटे सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडला.
 
 
trak
 
Ambulance hits truck  मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णवाहिका आणि ट्रकचा अपघात झाल्यानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिका (समृद्धी महामार्ग आयसी ०८) तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. पायलट रवि उर्फ सोनू शिंदे तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश राठोड यांनी तत्परतेने मदतकार्य हाती घेत जखमी तरुणाला प्राथमिक उपचार दिले. यानंतर जखमींना तातडीने कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, वेग आणि नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची शयता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.