अनिल कपूर यांचा जियो हॉटस्टारला 24 तासांचा अल्टिमेटम

    दिनांक :10-Apr-2026
Total Views |
मुंबई
Anil Kapoor बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अनिल कपूर यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक धक्कादायक पोस्ट शेअर केली आहे, ज्याने चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अनिल कपूर यांनी थेट ओटीटी प्लॅटफॉर्म 'जियो हॉटस्टार'ला उद्देशून धमकीचा इशारा दिला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "जियो हॉटस्टार, तुमच्याकडे 24 तास आहेत!" ही पोस्ट पाहताच नेटकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आले असून, नेमके काय घडले याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 

Anil Kapoor  
अनिल कपूर यांनी ही पोस्ट शेअर करताना जे कॅप्शन दिले आहे, त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी लिहिले की, 'नाहीतर मी हे संपूर्ण प्रकरण स्वतःच्या हातात घेईन.' अभिनेत्याचा हा उग्र अवतार पाहून चाहते चक्रावून गेले आहेत. अनेक नेटकऱ्यांनी यावर कमेंट्स करत असा अंदाज वर्तवला आहे की, हा त्यांच्या आगामी एखाद्या प्रोजेक्टच्या प्रमोशनचा भाग असू शकतो. तरीही, 24 तासांचा अल्टिमेटम दिल्याने सर्वांच्या नजरा आता उद्याच्या घडामोडींकडे लागल्या आहेत.
अनिल कपूर Anil Kapoor  सध्या त्यांच्या 'सुभेदार' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत, जो नुकताच प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला आहे. अशातच जियो हॉटस्टारला मिळालेली ही उघड धमकी म्हणजे त्यांच्या नवीन वेब सीरिज किंवा चित्रपटाचे मार्केटिंग 'गिमिक' असू शकते, असा अंदाज लावला जात आहे. यापूर्वीही अनेक सेलिब्रिटींनी अशा प्रकारे लक्ष वेधून घेण्याचे प्रयत्न केले आहेत. मात्र, अभिनेत्याने सरेआम धमकी दिल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले असून 24 तासांत सत्य समोर येईलच.