भोंदूबाबाचा डिजिटल पुरावा समोर... धक्कादायक खुलासे

    दिनांक :10-Apr-2026
Total Views |
नाशिक
Ashok Kharat आध्यात्मिक शक्ती आणि दैवी चमत्कारांचा बनाव रचून अनेक महिलांचे लैंगिक शोषण तसेच शेकडो भक्तांची आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणात नाशिक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने धक्कादायक पुरावे समोर आणले आहेत. सध्या पोलीस कोठडीत असलेल्या खरातची कसून चौकशी सुरू असून, जप्त करण्यात आलेल्या डिजिटल उपकरणांमधील माहितीने या संपूर्ण प्रकरणाचा गंभीर स्वरूप उघड झाल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे.
 

Ashok Kharat 
नाशिक येथील कॅनडा कॉर्नर परिसरातील त्याच्या मुख्य कार्यालयावर टाकण्यात आलेल्या छाप्यात लॅपटॉप, दोन पेन ड्राईव्ह आणि 64 GB क्षमतेचे OTG डिव्हाईस जप्त करण्यात आले. या सर्व उपकरणांचे फॉरेन्सिक विश्लेषण केल्यानंतर सुमारे 160 GB इतका डेटा रिकव्हर करण्यात आला असून, या डेटामध्ये कोडवर्ड स्वरूपातील अनेक फोल्डर आढळल्याची माहिती समोर आली आहे. या फोल्डरना ‘A’, ‘B’ आणि ‘C’ अशी कोडनेम्स देण्यात आली होती.
पोलिसांच्या Ashok Kharat  तपासानुसार ‘A’ कोडवर्ड असलेल्या फोल्डरमध्ये महिलांच्या शोषणाचे आणि कथित अत्याचारांचे गंभीर स्वरूप दर्शवणारे व्हिडिओ आणि संवाद आढळले आहेत. हा संपूर्ण डेटा नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीतील असल्याचे स्पष्ट झाले असून, त्यामध्ये संशयास्पद चॅट्स आणि आर्थिक व्यवहारांचेही पुरावे असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.दरम्यान, या प्रकरणात महेश कलंत्री या नव्या व्यक्तीचा सहभाग समोर आला असून त्याच्यावर बनावट आणि स्वस्त दरातील खडे पुरवून ते ‘सिद्ध केलेले रत्न’ असल्याचा दावा करत भक्तांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. हे खडे उच्च किमतीत विकले जात असल्याचेही तपासात समोर आले आहे. या व्यवहारातून मिळालेल्या नफ्याचे वाटप कोणाकोणाला होत होते, याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे.महेश कलंत्रीच्या अटकेनंतर या कथित फसवणूक रॅकेटमध्ये आणखी काही व्यक्तींचा सहभाग उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नाशिक पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली SIT ने तांत्रिक पुराव्यांसोबतच साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यासही सुरुवात केली आहे.तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेले 16 फोल्डर आणि डिजिटल पुरावे न्यायालयात महत्त्वपूर्ण ठरणार असून या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. भोंदूगिरीच्या नावाखाली चाललेल्या या कथित रॅकेटमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाल्याचेही तपासात अधोरेखित होत आहे.