बच्चू कडू ध्वनीफित प्रकरणात कारवाई करा

    दिनांक :10-Apr-2026
Total Views |
भाजपा पदाधिकार्‍यांचे ठाणेदारांना निवेदन
 
चांदूर बाजार, 
 Bachchu Kadu audio tape case माजी आमदार बच्चू कडू व गोलू माहोरे यांची सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली कथित ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळून संबंधितांवर कायदेशीर दंडात्मक कारवाई करा, अशी मागणी तालुका भाजपाचे अध्यक्ष रमेश तायवाडे यांनी पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांना दिले.
 

takyadi 
 
Bachchu Kadu audio tape case  आ. प्रवीण तायडे याचे चुलत भाऊ अभिजित तायडे यांच्या अपघाताचा बनाव करून त्यांना जीवे मारण्याची ध्वनीफित सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने, राज्याच्या राजकारणात खळबळ माजली असून दोन्ही पक्षाकडून आरोप प्रत्यारोप होत आहे. या घटनेमुळे राजकीय पक्षांमध्ये कार्य करणार्‍या सर्वसामान्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा प्रकारच्या गंभीर स्वरूपाच्या चर्चेमुळे सामान्य नागरिकांमध्येही दहशतीची भावना पसरत आहे. ही सर्व परिस्थिती पाहता ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळून संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करा. योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, या मागणीचे निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी सरपंच अजिंक्य चूनडे, सचिन तायवाडे, विकी राठी, अनिल वाट, अंकुश यावतकर, रुक्मिणी सहारे व असंख्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.