कार्यशाळेतून संघटन बळकटीकरणाचा निर्धार

    दिनांक :10-Apr-2026
Total Views |
विशेष सखोल पुनरावलोकन कार्यशाळा उत्साहात पार पडली
 
वाशीम, 
शहर मंडळात नगराध्यक्ष यांच्या जनसंपर्क कार्यालयात ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. BJP karyshala या कार्यशाळेस भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार किरिट सोमय्या यांची प्रमुख उपस्थिती व सर्वांना मार्गदर्शन लाभले. त्यांनी एसआयर मोहिमेचे उद्दिष्ट, कार्यपद्धती आणि संघटन विस्तारातील महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन करत कार्यकर्त्यांना दिशा दिली.
 
 
somayya
 
केंद्र व राज्य शासनाच्या योजना तळागाळापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी डखठ मोहीम महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यकर्त्यांसोबत हितगुज करून या विषयावरील प्रश्नांची सविस्तर उत्तरे देण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे यांनी करत कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. भाजपा नेते राजू राजे पाटील यांनी आपल्या मनोगतातून आपले मत कार्यकर्त्यांसमोर मांडले.
 
 
BJP karyshala  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा महामंत्री गणेश खंडाळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन शहराध्यक्षांनी मानले. कार्यशाळेच्या माध्यमातून संघटन अधिक सक्षम करण्याचा आणि एसआयर उपक्रम प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या कार्यशाळेस नगराध्यक्ष अनिल केंदळे, विधानसभा संयोजक धनंजय रणखांब, रिसोड विधानसभा संयोजक सुरेश मुंडे, अनसिंग मंडळ अध्यक्ष संतोष उगले, वाशीम तालुका मंडळ अध्यक्ष एकनाथ पाटील तसेच जिल्हा, तालुका व शहरातील महिला-पुरुष मोर्चा अध्यक्ष, प्रकोष्ठ अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख व शक्ती केंद्रप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.