मोठी बातमी...यमुनेत होडी उलटून दहा जणांचा मृत्यू

    दिनांक :10-Apr-2026
Total Views |
वृंदावन,
boat capsizes in Yamuna वृंदावन परिसरातील यमुना नदीत एक गंभीर दुर्घटना घडली असून नदीवरील तरंगत्या पुलाजवळ भाविकांना घेऊन जाणारी एक होडी अचानक उलटली. या घटनेत दहा भाविकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर आणखी बारा पेक्षा अधिक लोक बेपत्ता असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुर्घटना घडताच परिसरात एकच गोंधळ उडाला असून स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे.
 
Yamuna
 
 
बचाव पथकांनी यमुना नदीत शोधमोहीम सुरू केली असून पाणबुडे बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा शोध घेत आहेत. मथुरा जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती तीव्र शोक व्यक्त केला असून अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचून बचावकार्य अधिक वेगाने करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती आर्थिक मदत देण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.