वणी नॉर्थ एरियात कोळसा वाहतूक नियमांनुसार करा

    दिनांक :10-Apr-2026
Total Views |
अन्यथा मनसेचा कारवाईचा इशारा

वणी, 
Coal transportation वणी परिसरातील वेस्टर्न कोलफिल्ड्सच्या वणी उत्तर भागामध्ये सुरू असलेल्या कोळसा वाहतुकीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भंगार अवस्थेतील व फिटनेस प्रमाणपत्र नसलेली वाहने तसेच मोठ्या प्रमाणावर सुरू असलेले ओव्हरलोडिंग यामुळे रस्त्यांची दुरवस्था होत आहे. त्यामुळ अपघातांचा धोका वाढला आहे.
 
 
Coal transportation
 
या पृष्ठभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांनी आक्रमक भूमिका घेत परिवहन मंत्र्यांना पत्र पाठवले आहे. या पत्राद्वारे स्थानिक उपप्रादेशिक परिवहन विभाग व वेकोलि प्रशासनावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. यावर ठोस कारवाई न झाल्यास ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. इरशाद खान यांच्या निवेदनात, वणी नॉर्थ एरियामध्ये कोळसा वाहतुकीसाठी वापरली जाणारी अनेक वाहने अत्यंत खराब अवस्थेत आहेत. त्यांच्याकडे वैध फिटनेस प्रमाणपत्र नाही. मोटार वाहन अधिनियम व केंद्रीय मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करून ही वाहने सर्रास रस्त्यावर धावत आहेत. यासोबतच मोठ्या प्रमाणावर ओव्हरलोडिंग होत असूनही आरटीओ जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
 
 
 
Coal transportation  तसेच आरटीओ अधिकारी व कोळसा वाहतूकदार यांच्यातील आर्थिक हितसंबंधांमुळे नियमांचे उल्लंघन करणाèया वाहनांवर कोणतीही कारवाई होत नसल्याचेही निवेदनात नमूद आहे. परिणामी, रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर हानी होत असून नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे. कोळसा वाहतूक करणारे ट्रक आता ‘चालते-फिरते मृत्यूचे सापळे’ बनले आहेत. नागरिकांच्या जीवाशी खेळणाèया या व्यवस्थेविरोधात मनसे गप्प बसणार नाही, असा इशारा इरशाद खान यांनी दिला आहे. प्रशासनाने सर्व जड वाहनांची फिटनेस तपासणी करून ओव्हरलोडिंगवर आळा घालावा, अन्यथा वणी परिसरात तीव्र ‘काम बंद’ आंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनादरम्यान होणाèया कोणत्याही परिणामांना आरटीओ आणि वेकोलि जबाबदार राहील, असेही त्यांनी म्हटले आहे.