विरोधकांबाबत आक्रमक भूमिका घेणारा अध्यक्ष निवडणार

    दिनांक :10-Apr-2026
Total Views |
शहर काँग्रेस अध्यक्ष निवडीसाठी निरीक्षकांकडून चाचपणी सुरू

नागपूर,
Congress President Election सृजन अभियान’ अंतर्गत काँग्रेसचे राष्ट्रीय नेतृत्व संघटन बळकटीकरणावर भर दिल्या जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भूमिकेनुसार स्थानिक पातळीवर सक्षम नेतृत्व उभे करण्यासाठी विरोधकांबाबत आक्रमक भूमिका घेणारा शहर अध्यक्ष निवडणार असल्याची माहिती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने नियुक्त केलेले निरीक्षक अरुण यादव यांनी पत्रपरिषदेत सांगितले. यावेळी शहराध्यक्ष आ. विकास आ. अभिजित वंजारी, मनपा विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर, अनिस अहमद, गिरीश पांडव, अतुल कोटेचा, विशाल मुत्तेमवार, संदेश सिंगलकर, प्रशांत धवड, उमाकांत अग्निहोत्री, संजय दुबे आदी उपस्थित होते.
 
 
arun-yadav
 
शहर अध्यक्षपद आपल्याकडे यावे याकरिता काँग्रेसमधील विविध गटांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यात प्रामुख्याने नागपूर शहर अध्यक्षपदाच्या शर्यतीत पदवीधर मतदारसंघाचे आ. अभिजित यांच्यासह गिरीश पांडव, प्रदेश सरचिटणीस अतुल कोटेचा, आ.नितीन राऊत गटातून संजय दुबे, संदेश सिंगलकर, प्रशांत धवड, संजय महाकाळकर यांचे नाव घेतल्या जात आहे.
 
 
सक्षम नेतृत्व निवडण्याचे आव्हान
मुख्यत: शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सुरू झालेल्या निवड प्रक्रियेत पक्षासमोर प्रभावी, आक्रमक आणि संघटनात्मकदृष्ट्या सक्षम नेतृत्व निवडण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. विशेषतः भाजपशी वा अप्रत्यक्ष संबंध नसलेला आणि पक्षाची भूमिका ठामपणे मांडणारा नेता निवडण्याची मागणी होत आहे. गत १३ वर्षांपासून आमदार विकास ठाकरे हे शहर काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहे. शहर अध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून काँग्रेसचे निरीक्षक शुक्रवारी नागपुरात आले. आता १५ एप्रिलपर्यंत शहराच्या दौर्‍यावर असल्याने शहर अध्यक्षपदासाठी इच्छूक असलेल्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने नियुक्त केलेले निरीक्षक अरुण यादव तसेच प्रदेश निरीक्षक माणिकराव ठाकरे, अशोक बोबडे आणि जिया पटेल यांनी बैठकीचे सत्र सुरू केले आहे.

बैठका व मुलाखतींनंतर अहवाल तयार होणार
Congress President Election  आगामी काही दिवसांत हे निरीक्षक विविध गटांशी संवाद साधून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. काही इच्छुकांनी दावेदारी सादर केली आहे. पक्षांतर्गत गटबाजी आणि समतोल साधण्याचे आव्हान निरीक्षकांसमोर असून बैठका व मुलाखतींनंतर तयार होणारा अहवाल दिल्लीतील नेतृत्वाकडे सादर केला जाणार आहे. नागपूर शहर काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाबाबत अंतिम निर्णय लवकरच जाहीर होईल, अशी माहिती अरुण यादव यांनी दिली. 
 
 
काँग्रेसचे निरीक्षक १२ एप्रिलला त्रिमूर्ती नगरच्या भगवती शहर कार्यकारिणीतील पदाधिकार्‍यांशी चर्चा करणार आहे. तर १५ एप्रिलला सर्व मुलाखती झाल्यानंतर निरीक्षक आपला अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे सादर करतील.