नागपूर,
Sathya Sai Society गायत्री परिवार नागपूरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कलश आणि अखंड ज्योती यात्रेचे सत्यसाई सोसायटी, ससाणे लेआउट येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. या प्रसंगी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला होता. महिलांनी सुंदर रांगोळ्या काढून परिसर सजवला होता आणि गायत्री मंत्राच्या निनादाने वातावरण अधिक पवित्र झाले.
कार्यक्रमादरम्यान महिलांनी सामूहिक आरती केली आणि उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. या धार्मिक सोहळ्यात सुनीता श्रीवास्तव, सुनंदा रिनायत, विजू देने, लता राऊत, मोनिका राऊत, मीनाक्षी राऊत, वत्सला राऊत, प्रतिमा मिश्रा, योगिता राऊत, पुष्पकला रिनायत, शुभांगी गौतम, दीपिका चौधरी, पल्लवी कांबळे, मनीष चौधरी, रोहित श्रीवास्तव, विवेक मेंढी, बंटी राऊत, रत्ना काकडे आणि दुलीचंद राऊत यांसह अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. Sathya Sai Society या यात्रेमुळे परिसरात भक्ती, श्रद्धा आणि एकात्मतेचा सुंदर संगम पाहायला मिळाला.
सौजन्य: विवेक मेंढी, संपर्क मित्र