मुंबई,
Dhurandhar 2 धुरंधर 2 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला. बॉक्स ऑफिसवर 1600 कोटींहून अधिक कमाई केल्यानंतर आता प्रेक्षक धुरंधर 2 ओटीटी वर कधी रिलीज होणार याची आतुरतेने वाट पाहत आहेत. थिएटरमध्ये जबरदस्त कमाई केल्यानंतर ‘धुरंधर 2’ आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही धमाका करणार आहे.
रणवीर सिंहच्या या स्पाय-थ्रिलर सिनेमाची क्रेझ अजूनही कमी झालेली नाही. 19 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमानं पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवरील अनेक विक्रम मोडलेत.दिग्दर्शक आदित्य धर यांनी या चित्रपटाचे ओटीटी हक्क जिओ हॉटस्टार ला विकले आहेत. Dhurandhar 2 त्यामुळे हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होणार असल्याची चर्चा आहे.जिओ हॉटस्टार वर ‘धुरंधर 2’ला इंडियन प्रीमियर लीग २०२६ 2026 नंतर रिलीज करण्याची तयारी करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे हा चित्रपट मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात ओटीटी वर येण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप मेकर्स किंवा प्लॅटफॉर्मकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.