मोकाट कुत्र्यांचा बकरीवर हल्ला

    दिनांक :10-Apr-2026
Total Views |
मोकाट कुत्र्यांच्या हैदोसाने नागरिक त्रस्त
 
कारंजा लाड, 
शहरातील पंचवटी परिसरात Dog attack मोकाट कुत्रे आणि बकर्‍यांचा प्रचंड उपद्रव वाढल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः त्रस्त झाले असून, परिसरात अस्वच्छता व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या घाणीमुळे दुर्गंधी पसरत असून, सार्वजनिक आरोग्याचा प्र÷श्न गंभीर बनला आहे.परिसरात मोठ्या प्रमाणावर बकर्‍यांचा वावर असल्याने सर्वत्र घाण साचत असून, जणू काही गोठाच असल्याचा भास निर्माण होत आहे. यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
 
 
dog
 
Dog attack  पंचवटी परिसरात संमती ज्ञान मंदिर, कुंकूबाई कन्या शाळा, जे.सी. हायस्कूल, जे.डी. चवरे विद्यालय, केशव गुरुकुल अशा अनेक शैक्षणिक संस्था आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची सतत ये-जा सुरू असते. मात्र मोकाट कुत्रे रस्त्यावरून जाणार्‍या महिला व लहान मुलांच्या अंगावर धावत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक पालकांनी मुलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.याशिवाय, कुत्र्यांकडून मोटारसायकलींच्या सीट फाडण्याच्या घटनाही वाढल्या असून, वाहनधारकांना आपली वाहने झाकून ठेवावी लागत आहेत. शुक्रवारी १० तारखेला तर कुत्र्यांनी एका बकरीचा फडशा पाडल्याची धक्कादायक घटना घडली, ज्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे सावट अधिकच गडद झाले आहे. नागरिकांनी अनेकदा नगर परिषद प्रशासनाकडे तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्रशासन नेमके कधी जागे होणार? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पंचवटी परिसरातील मोकाट कुत्रे व बकर्‍यांच्या वाढत्या उपद्रवावर तात्काळ उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.