वाशीम,
double murder case दुहेरी हत्याकांडातील आरोपी सचिन थोरात रा. पर्वती पुणे याला सत्र न्यायाधीश वैभव पाटील यांनी आजन्म कारावास व १० हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली. दंड भरण्यात कसूर केल्यास १ वर्ष अतिरिक्त साध्या कारवासाची शिक्षा १० एप्रिल रोजी सुनावली. याबाबत सविस्तर असे की, वाशीम जिल्ह्यातील मंगरुळनाथ तालयातील फिर्यादी मदत तुकाराम जुंगाडे यांनी पोलिस स्टेशनला तक्रार दिली की, ते शेलुबाजार येथे पोलिस पाटील या पदावर कार्यरत आहे. त्यांचे गावात निर्मला भिकजी पवार ही वास्तव्यास असून, तिला एक मुलगा अनिल पवार व दोन मुली नामे विजया व सारीका असून, दोन्ही मुलींचे लग्न झाले आहे.
त्यापैकी विजया हिचे बबन गुंजावळे रा. जिंतूर जि. परभणी यांचेशी लग्न झाले तर सारीका हिचे लग्न सचिन धर्मराज थोरात रा. पुणे यांचेशी झाले. १३ मे २०२२ रोजी ८ वाजता दरम्यान माहिती मिळाली की, निर्मलाबाई पवार हिचे घरासमोर तिचा छोटा जावई हा निर्मलाबाई व त्यांची मोठी मुलगी विजया यांना लोखंडी सत्तुराने मारहाण करीत आहे. त्यावरुन घटनास्थळी जावून पाहीले असता निर्मलाबाई पवार व विजया गुंजावळे या दोघी रक्ताच्या थारोळ्यात बशुध्दावस्थेत पडलेल्या दिसून आल्या. तेथे बाजूलाच सचिन थोरात हा हातात लोखंडी सत्तुर घेवून उभा होता. उपरोक्त दोघींना शेलुबाजार येथील प्राथ. आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले असता डॉटरांनी मृत घोषीत केले.
double murder case अशा आशयाच्या तक्रारीवरुन आरोपी सचिन थोरात विरुध्द गुन्हा दाखल करुन सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. या प्रकरणाचा तपास सपोनि तुषार जाधव यांनी केला. सदर खटल्यामध्ये आरोपी सचिन थोरात विरुध्द सरकार पक्षाच्या वतीने १५ साक्षीदार यांची साक्ष नोंदविली. याप्रकरणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सुरया बानो शेख जलील, फिर्यादी मदत जुंगाडे, सुनील हरणे, पोकॉ संदीप खडसे, मृतकाचा पती अप्पराव गुंजावळे, वैद्यकीय अधिकारी, तपास अधिकारी व इतर महत्वाचे साक्षीदार यांची साक्ष ग्राह्य धरुन आरोपी आजन्म कारवासाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अॅड. जी. डी. गंगावणे यांनी कामकाज पाहीले.