यवतमाळ,
Dr. Devendra Punse विदर्भ साहित्य संघाच्या नुकत्याच झालेल्या कार्यकारी मंडळ निवडणुकीमध्ये ‘सृजन सेतू’ पॅनेलने एकहाती विजय प्राप्त केला. अध्यक्ष म्हणून डॉ. गिरीश गांधी आणि कार्यकारी सदस्यपदी या पॅनेलचे २२ पैकी २१ उमेदवार विजयी झाले.
२०२६ ते २०३१ या पाच वर्षांसाठी निवडून आलेल्या अध्यक्षांसह नूतन कार्यकारणीचे पदग‘हण बुधवार, १ एप्रिल रोजी वि. सा. पार पडले. या कार्यकारिणीत यवतमाळचे डॉ. देवेंद्र पुनसे यांच्याकडे सांस्कृतिक संकुल समितीचे सहसंचालक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
Dr. Devendra Punse प्रा. डॉ. देवेंद्र पुनसे हे मराठी, इंग‘जी व हिंदी या तिन्ही भाषांमध्ये लेखन करणारे साहित्यिक आहेत. त्यांच्या ‘पोळा आणि बाहुली’ या दीर्घकथा संग‘हाला महाराष्ट्र सरकारचा ‘बी. रघुनाथ पुरस्कार’ मिळाला आहे. विविध साहित्य संस्थांचे सोळा प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना आजपर्यंत प्राप्त झाले आहेत. वि. सा. संघाचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी व सरचिटणीस विलास मानेकर यांच्या मार्गदर्शनात, तसेच सर्व सदस्यांच्या सहयोगाने साहित्य सेवेचे कार्य सुरू राहील, असा विश्वास नियुक्तीनंतर डॉ. देवेंद्र पुनसे यांनी व्यक्त केला.