गडचिरोली,
सरकारची कामगिरी आणि सरकारच्या योजनांवर प्रकाश टाकत कार्यकर्त्यांनी सरकारच्या योजना जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन माजी आमदार Dr. Namdev Usendi डॉ. नामदेव उसेंडी यांनी केले. तसेच पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या एकात्म मानववाद आणि अंत्योदय सिद्धांतांवर चर्चा करण्यात आली. सरकारच्या जनहितकारी योजनांची माहिती देऊन कार्यकर्त्यांना संघटनाची मजबूती करण्याचे आवाहन करण्यात आले.
भाजपा परिवाराच्या वतीने देशभरात राबविण्यात येत असलेल्या ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाभियान’ 2026 अंतर्गत क्रीडा संकुल सिरोंचा येथे 7 ते 8 एप्रिल असे दोन दिवसीय भाजपा पदाधिकार्यांची निवासी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी माजी आमदार Dr. Namdev Usendi डॉ. नामदेव उसेंडी बोलत होते. यावेळी भाजपचा इतिहास व विकास, वैचारिक अधिष्ठान, कार्यपद्धती, कार्यविस्तार आमची दृष्टी, सरकारच्या उपलब्धी व अंमलबजावणी, तसेच बूथ व्यवस्थापन अशा महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांचे नेतृत्व कौशल्य, संघटन कौशल्य आणि समाजसुधारणेची बांधिलकी अधिक दृढ होत असून, स्थानिक पातळीवर सकारात्मक सामाजिक परिवर्तन घडविण्याची क्षमता वाढते.
Dr. Namdev Usendi श्रद्धेय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेल्या ‘एकात्म मानववाद’ या विचारधारेवर आधारित सेवा, समर्पण आणि राष्ट्रहित या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून भारतीय जनता पक्ष कार्य करत आहे. या विचारांना अधिक बळ देत देशभरातील कार्यकर्त्यांना वैचारिक व संघटनात्मक बळ मिळावे, या उद्देशाने हे प्रशिक्षण महाभियान राबविण्यात येत आहे. माजी पालकमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांनी पक्षाचा इतिहास, पक्षाची विचारधारा, संघटनात्मक कार्यपद्धती आणि जनसेवेची भूमिका यावर मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांना पक्षाच्या मूलभूत मूल्यांवर दृढ राहून जनसेवेचे कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी तसेच किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी युवा नेते अवधेशबाबा आत्राम, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जेष्ट नेते सत्यम मनचर्लावार, भाजपा तालुकाध्यक्ष श्रीनाथ राऊत, माजी तालुकाध्यक्ष शंकर नरहरी, जेष्ट नेते दामोधर अरगेला, डॉ. श्रीकांत सुगरवार, संतोष पडाला, किरण कुलसंगे, शराध्यक्ष शरीख शेख, यांच्यासह भाजपाचे बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.