डेहनीच्या फार्म हाऊसला भीषण आग

    दिनांक :10-Apr-2026
Total Views |
मोसंबी बागेसह शेतसाहित्य खाक
 
तिवसा, 
Fire at Dehni Farm House तालुक्यातील मौजे डेहनी रोडवरील शेतकरी रंगराव लव्हाळे यांच्या फार्म हाऊसला आज सायंकाळी सुमारे ६ वाजता अचानक भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. या आगीत मोसंबीची झाडे, स्प्रिंकलर पाईप, ताडपत्री, बांबू (बासे) तसेच शेतीसाठी साठवून ठेवलेले शेणखत पूर्णतः जळून खाक झाले असून शेतकर्‍यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. माहितीनुसार, तिवसा - निंभोरा रोडलगतच्या डेहनी परिसरातील लव्हाळे यांचे अद्यावत फार्म हाऊस आहे. सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागल्याने काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले. परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली.
 
 
aag
 
Fire at Dehni Farm House  घटनेची माहिती मिळताच तिवसा नगरपंचायत अग्निशामक दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक कर्मचारी विजय यावले, अंकित माहुरे, राहुल आसोडे तसेच वाहनचालक वैभव बोकडे यांच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी शेतसाहित्य व बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट असून संबंधित यंत्रणेकडून तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.