इराणचे माजी परराष्ट्र मंत्री कमाल खर्राजी यांचे निधन!

    दिनांक :10-Apr-2026
Total Views |
तेहरान,
kamal-kharrazi-passes-away : इराणचे माजी परराष्ट्र मंत्री कमाल खर्राजी यांचे निधन झाले असून या घटनेमुळे इराणच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. सरकारी दूरदर्शनने त्यांच्या निधनाची अधिकृत माहिती दिली आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत काही दिवसांपासून उपचार सुरू होते, अशी माहिती समोर आली आहे.
 
 

DEATH
 
 
कमाल खर्राजी हे इराणच्या परराष्ट्र धोरणात महत्त्वाची भूमिका बजावणारे अनुभवी नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांनी मोहम्मद खातामी यांच्या कार्यकाळात परराष्ट्र मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतरही ते देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या सल्लागार मंडळात सक्रिय होते आणि परराष्ट्र धोरणाशी संबंधित महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग राहिला.
 
ते ‘स्ट्रॅटेजिक फॉरेन रिलेशन्स कौन्सिल’चे अध्यक्ष होते, जी संस्था इराणच्या परराष्ट्र धोरणाबाबत मार्गदर्शन करणारी महत्त्वाची यंत्रणा मानली जाते. त्यांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये इराणची भूमिका मांडण्यात मोठे योगदान दिले.