नोकरीचे आमिष दाखवून ७.५० लाखांची फसवणूक

    दिनांक :10-Apr-2026
Total Views |
दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

वणी, 
Fraud चंद्रपूर जिल्हा परिषद येथे आरोग्यसेवक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका सेवानिवृत्त शिक्षकाची ७ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध वणी पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेंद्र आस्कर (वय ६२, घोन्सा, चिखलगाव) व सचिन गारघाटे (वय ५१, चंद्रपूर) यांनी चिखलगाव (वणी) येथील सेवानिवृत्त शिक्षक सुरेंद्र बोबडे यांना चंद्रपूर जिल्हा परिषदेत आरोग्यसेवक पदावर नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. या बदल्यात आरोपींनी बोबडे यांच्याकडून एकूण ७ लाख ५० हजार रुपये घेतले.
 
 
fraukd
 
Fraud  या ७ लाख रुपये धनादेशाद्वारे तर ५० हजार रुपये रोख स्वरूपात स्वीकारण्यात आले. मात्र, परीक्षा झाल्यानंतर आरोपींनी मोबाईल फोन बंद केले. तसेच खोटे इसारपत्र देऊन दिशाभूल केली. याशिवाय दिलेला धनादेशही बाऊन्स झाल्याने फसवणुकीचा प्रकार समोर आला. या प्रकरणी पीडिताच्या तक‘ारीवरून वणी पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पोलिस करीत आहे. सरकारी नोकरीचे आमिष दाखवून पैशांची मागणी करणार्‍या व्यक्तींवर विश्वास ठेवू नये. अशा फसवणुकीस बळी पडल्यास नागरिकांनी त्वरित जवळच्या पोलिस ठाण्यात तक‘ार नोंदवावी, असे आवाहन वणी पोलिसांनी केले आहे.