नवी दिल्ली,
Gangotri-Yamunotri open on April 19 उत्तराखंडमध्ये प्रसिद्ध असलेल्या चार प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या यात्रेला येत्या १९ एप्रिलपासून सुरुवात होणार असून यमुनोत्री आणि गंगोत्री मंदिरांचे कपाट उघडणार आहे. याच यात्रेच्या पुढील टप्प्यात केदारनाथ मंदिराचे कपाट २२ एप्रिल रोजी उघडणार आहे. आतापर्यंत सुमारे चौदा लाख यात्रेकरूंनी यात्रेसाठी नोंदणी केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान हिंदूंसाठी चारधाम यात्रा ही अत्यंत महत्त्वाची धार्मिक यात्रा मानली जाते.