शाळेचे वय वर्ष १६७ विद्यार्थी फक्त ७७!

    दिनांक :10-Apr-2026
Total Views |
घोराडची जिल्हा परिषद शाळा
 
विजय माहुरे
सेलू, 
Ghorad Zilla Parishad School वर्धा जिल्ह्यात सेलू तालुयातील घोराडची जिल्हा परिषद शाळा ही १६७ वर्षाची झाली आहे. जिल्ह्यात कदाचित ही पहिली शाळा असल्याचे सांगितले जात आहे. या शाळेने हजारो विद्यार्थी घडवले आणि शेकडो विद्यार्थी उच्च पदापर्यंत पोहोचले. या गावात शिक्षकांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शिक्षकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत यावर्षी फत ७७ विद्यार्थी आहेत. हे फक्त इंग्रजी शाळेने घडवलेले चित्र असल्याची गावात दिसत आहे.
 
 
ghkorad
 
ब्रिटिश काळात घोराड येथे असलेल्या गढीवर १६७ वर्षापूर्वी शाळेची पहिली घंटी वाजली. याच शाळेच्या बाजूला राजे रघुजी भोसले यांची कचेरी होती असे बोलल्या जाते. राजे रघुजी यांचे या भागावर साम्राज्य होते. स्वातंत्र्यानंतर हा भाग मध्यप्रदेशात होता तेव्हा जनपद अंतर्गत ही शाळा चालविल्या गेली. हा भाग महाराष्ट्रात सामील झाल्या नंतर जिल्हा परिषद अंतर्गत ही शाळा आजही सुरू आहे. या शाळेतून शिक्षण घेतलेले विद्यार्थी उच्च पदावर पोहोचले आहेत. या शाळेत १९७५ ते २००६ पर्यंत येथे विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती आणि तेव्हा गावाची लोकसंख्या कमी होती. पण, आज लोकसंख्या ६ हजारावर असताना विद्यार्थ्यांची संख्या रोडावली आहे. कॉन्व्हेट संस्कृतीचा हा परिणाम असल्याचे बोलल्या जात आहे. २००६ मध्ये २४३ असलेली विद्यार्थी संख्या २० वर्षाच्या कालावधीत २०२६ मध्ये ७७ वर आली आहे.
 
 
Ghorad Zilla Parishad School सर्वात जास्त शिक्षक असलेले गाव म्हणून घोराड गावाला ओळखले जात होते. आजही शिक्षकाची संख्या तालुयात सर्वात जास्त याच गावात आहे. या शाळेतून शिक्षण घेणारे विद्यार्थी अभियंता, ग्रामसेवक, तलाठी, उप जिल्हाधिकारी, तहसीलदार, आदी पदावर चांगली कामगिरी केली आहेत. आजही या गावात सरकारी नोकरीवर असणार्‍यांची संख्या अधिक आहे.
 
 
 

ब्रिटिशकालीन राजवटीत सुरू झालेल्या जिल्हा परिषद शाळेचा वीस वर्षाचा आलेख पाहता २००६ मध्ये या शाळेत २४३ विद्यार्थी संख्या व ७ शिक्षक होते, २०१६ मध्ये १३५ विद्यार्थी ६ शिक्षक. मात्र, २०२६ मध्ये ७७ विद्यार्थी असून ३ शिक्षक आहे. १६७ वर्षाच्या शाळेत विद्यार्थी संख्या घटतेय आहे ही चिंताजनक बाब बनली आहे. मुख्याध्यापिका व शिक्षिका शाळेची विद्यार्थी संख्या वाढीसाठी प्रयत्नरत आहे.