आर्णी,
Giving life to a python तालुक्यातील शेकलगाव येथील पंकज नाईक यांच्या शेतात मोठा साप निघाल्याची घटना ‘एमएच29 हेल्पिंग हॅण्ड’ चमूला मिळाली. त्यांनी घटनास्थळ गाठताच तो अजगर असल्याचे लक्षात आले. त्या अजगराला सुखरूप पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
Giving life to a python सर्पमित्र इमरान शेख व चमूने शेकलगाव येथे पंकज नाईक यांच्या शेतात 7 ते 8 फूटांचा मोठा बिनविषारी अजगर पकडला. वन्यजीव संरक्षण 1972 कायद्यांतर्गत शेड्युल 1 मध्ये अजगर येतो. त्याला विनाकारण मारणे कायद्याने गुन्हा आहे. असे केल्यास दंड व कारावासाची तरतूद आहे. पकडलेल्या अजगराची आर्णी वनविभागात नोंद करून त्या अजगराला त्याच्या अधिवासात मुक्त करण्यात आले. यावेळी हेल्पिंग हॅण्डसचे तालुकाध्यक्ष अनिकेत पंडित, अनूप ठाकरे, सुजल ठवकर, मानस चांदेकर व आर्णी वन विभाग कर्मचारी उपस्थित होते.