अमरावतीत सुरेश भट स्मारक, गजल गुरूकुल

    दिनांक :10-Apr-2026
Total Views |
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा
गजलनवाज पांचाळेंचा अमृत महोत्सवी सत्कार
 
अमरावती,
अमरावतीला गझलेचा समृद्ध वारसा आहे. कविवर्य सुरेश भट यांनी सुरू केलेला प्रवास भिमराव पांचाळे यांनी जपला आहे. या महान व्यक्तींच्या कार्याचा वारसा पुढे चालावा यासाठी सुरेश भट यांचे स्मारक आणि गजलेसाठी गुरूकुल उभारण्याची महत्वपूर्ण घोषणा Guardian Minister Chandrashekhar Bawankule पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
 
 
bawan ds
 
गजलनवाज भिमराव पांचाळे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त ईलेक्ट्रॉनिक मिडीया असोशिएशनच्या वतीने शुक्रवारी सांस्कृतिक भवनात नागरी सत्कार पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार बळवंत वानखेडे, आमदार संजय खोडके, केवलराम काळे, सुलभा खोडके, राजेश वानखडे, प्रवीण तायडे, महापौर श्रीचंद तेजवाणी, प्रवीण पोटे, हेमंत काळमेघ, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलिस आयुक्त राकेश ओला, ईलेक्ट्रॉनिक मिडीया असोशिएशनचे अध्यक्ष नितेश राऊत, गिता पांचाळे, भाग्यश्री पांचाळे आदी उपस्थित होते.
 
 
Guardian Minister Chandrashekhar Bawankule  पालकमंत्री बावनकुळे पुढे म्हणाले, स्मारक आणि गुरूकुलासाठी जागा आणि निधीची तरतूद शासन करणार आहे. यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, तसेच गझलेसाठी जीवन समर्पित करणारे पांचाळे यांनी गुरूकुलाची जबाबदारी स्विकारावी असे आवाहन केले. यातून गझलेचे जतन आणि संवर्धन होण्यास मदत हाईल. लवकरच या दोन्हीचे भूमिपूजन करण्याचा मानस असून यावेळी पांचाळे यांचा नागरी सत्कार करण्यात येईल. भिमराव पांचाळे म्हणाले, अमरावतीमुळे जीवन सुकर झाले. नागरिकांचे प्रेम आणि गजलेने मोठे केले आहे. सुरेश भटांना आदर्श मानून सुरू केलेल्या प्रवासाला पन्नास वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. कष्ट हे सर्वांना असून त्याचे उदात्तीकरण न करता ध्येय ठेऊन वाटचाल केल्याने या टप्प्यापर्यंत पोहोचता आल्याचे त्यांनी सांगितले. सुरवातीला पांचाळे यांची पुस्तकतुला करून पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. संजय शेंडे यांनी प्रास्ताविक केले. क्षिप्रा मानकर यांनी सूत्रसंचालन केले.