जिविका महिला संस्थेत चैत्र गौरी निमित्त हळदी-कुंकू उत्साहात

    दिनांक :10-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Jeevika Mahila Sanstha जिविका महिला सेवा सहकारी संस्थेच्या वतीने चैत्र गौरी निमित्त हळदी-कुंकू कार्यक्रम नगरसेविका प्रभाग ३६, माया हाडे यांच्या नियोजनातून त्यांच्या निवासस्थानी उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन वैष्णवी जगदाळे, अरुंधती रंभाड, वनश्री गर्गे, पल्लवी भालेराव, संगीता मेलग आणि करुणा करंजकर यांनी केले. यावेळी दीपप्रज्वलन करून देवीची सुंदर आरास करण्यात आली. त्यानंतर पूजा, आरती, भजन आणि भक्तीगीतांचा कार्यक्रम भक्तिभावाने साजरा करण्यात आला. कार्यक्रम यथायोग्य पद्धतीने पार पडत उपस्थित महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
 
Jeevika Mahila Sanstha
 
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वर्षा गोडबोले, संगीता भावे, वंदिता मेलग, हेमा शेंडे, सपना रोडे, हर्षा वाघमारे, साधना बरबडे, साधना खरपकर आणि कविता सोमळकर यांनी सहकार्य केले. Jeevika Mahila Sanstha तसेच लता खापेकर, योगिता विश्वास, वंदना कुलकर्णी, रंजना चौहान, अर्चना देशपांडे यांसह अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचा समारोप आंबेडाळ, पन्हे आणि नाश्त्याच्या वाटपाने करण्यात आला.
सौजन्य: सपना रोडी, संपर्क मित्र