९८३३ मुलींपैकी फत ४७२ मुलीच घेतली व्हॅसिन
वर्धा,
HPV vaccination campaigns आजच्या किशोरवयीन मुली उद्याच्या प्रगत भारताच्या सशत महिला म्हणून पुढे येणार आहेत. सुरक्षित मातृत्व, माता व बाल मृत्यू रोखणे या हेतूने शासन विविध योजनाही राबवित आहे. तर सध्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला वेळीच आळा घालण्यासाठी व महिलांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्याकरिता आरोग्य विभागाच्या वतीने लस आपल्या लेकीची, सुरक्षा तिच्या भविष्याची या मोहिमेंतर्गत एचपीव्ही लसीकरण मोहीम राबविली जात आहे. पण या उपक्रमाला जिल्ह्यातील किशोरवयीन मुलींचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे झालेल्या लसीकरणाच्या आकडेवारीवरून बघावयास मिळत आहे. ९८३३ मुलींपैकी फत ४७२ मुलींनीच लस घेतल्याचे पुढे आले आहे.
HPV vaccination campaigns एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्ह्यातील सुमारे ९ हजार ८३३ किशोरवयीन मुलींना लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. शिवाय किशोरवयीन मुलींनी स्वयंस्फूर्तीने ही लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी केले आहे. पण, वास्तविक पाहता ७ एप्रिलपर्यंत केवळ ४७२ मुलींनीच ही लस घेतल्याचे वास्तव आहे. एचपीव्ही लसीकरण मोहिमेदरम्यान १४ वर्ष पूर्ण झालेल्या; मात्र १५ वर्ष पूर्ण न झालेल्या किशोरवयीन मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देण्यासाठी एचपीव्हीचे मोफत लसीकरण केले जात आहे. गर्भाशय मुखाचा कर्करोग हा भारतातील महिलांमध्ये आढणारा दुसर्या क्रमांकाचा सर्वात सामान्य कर्करोग आहे. एचपीव्ही लस या आजाराला प्रतिबंध करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. शिवाय लस ९० टयांहून अधिक संरक्षण प्रदान करते. ही लस सर्व शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे. ही लस जागतिक आरोग्य संघटनेद्वारे प्रमाणित असून पुर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले.
तालुकानिहाय लसीकरणाची कामगिरी
आर्वी : ८८
आष्टी : ४९
देवळी : ६२
हिंगणघाट : ४६
कारंजा : ३४
समुद्रपूर : ३८
सेलू : ३७
वर्धा : ११८