बुलढाणा,
Iqbal Chowk Jama Masjid शुक्रवारची़ नमाज या विषायावरून एकाच समाजातील दोन गटात आपसांत हाणामारी झाल्याची घटना शहरातील इकबाल चौकात दि. १० एप्रिल रोजी दुपारी घडली. या हाणामारीत दोन्ही गटातील ८ जण जखमी झाले असून त्यातील ३ जण गंभीर आहेत. नमाज कोण पढेल यावरून हा वाद झाला. पोलिसांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला परंतु दोन गटात हाणामारी झाली. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मागील तीन वर्षांपासून Iqbal Chowk Jama Masjid इकबाल चौकातील जामा मशीदच्या ट्रस्टमध्ये अंतर्गत वाद सुरु आहेत. हाफीज रहमत हे मागील ३० वर्षांपासून याठिकाणी नमाज पठण करीत आहेत. परंतु ते आता वृद्ध झाले असून ते आजारी आहेत म्हणून त्यांना नमाज पठणापासून रोखण्याचा मशीदचे ट्रस्टी इलियास कच्ची यांनी निर्णय घेतला असल्याचे समजते. परंतु सदर निर्णयाला परिसरातील लोकांनी विरोध दर्शविला. काहींचे म्हणणे आहे की, जामा मशीद ही सर्वांसाठी आहे. याठिकाणी तबलीक, सुन्नी, अहैल हदीस, जमात-ए-इस्लामी असे सर्व समुदाय नमाज पठण करतात. परंतु कच्ची यांना परप्रांतातून सुन्नी मौलाना आणायचा आहे. असे झाले तर मशीद ही मर्यादित होईल, असा आरोप विरोधींचा आहे.
Iqbal Chowk Jama Masjid आज, दुपारी शुक्रवारची नमाजच्या वेळेस हाफीज रहमत यांना ट्रस्टकडून विरोध झाला. त्यानंतर आत नमाजच्या वेळीच धरपकड झाली तर बाहेर दोन गटात राडा झाला. बाहेर मुश्ताक मन्यार तसेच २० ते २५ जणांनी हल्ला केल्याचे जखमी कुरेशी परिवारांचे म्हणणे होते. दगड, लाठी काठींसह हाणामारी झाली. यात दोन्ही गटातील ८ जण जख्मी झाले आहेत. जखमींमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. दानिश कुरेशी नाजीम कुरेशी वय १४, शेख साबीर शेख अफसर वय ४५, शेख मोईन शेख आकिब वय २२, शेख उमर शख जाकीर वय २१, शेख आदिब शेख साबिर वय १६, जाकिर शेख अफसर वय ५०, सैय्य तौफिस वय २८ इत्यादी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांची अतिरीक्त तुकडी तत्काळ घटनास्थळावर दाखल झाली होती. त्यामुळे स्थिती आटोयात आली. वृत्त लिहेपर्यंत पोस्टेला गुन्हा दाखल झाला नव्हता.