- ‘ध्येयतरंग’ सोहळ्यात धनराज भगत यांचा गौरव
आमगाव,
विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे नगरीतील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र आयोजित विनर ऑफ द इयर व आय एम विनर या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा २०२६ च्या बक्षीस वितरण सोहळ्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये आमगाव येथील Journalist Dhanraj Bhagat पत्रकार धनराज भगत यांचा राज्यस्तरीय सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक सुदाम शेडगे होते.
Journalist Dhanraj Bhagat यावेळी छत्रपती संभाजीनगरचे उपजिल्हाधिकारी शुभम पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. समाजात शैक्षणिक जनजागृती निर्माण करण्यात आणि ध्येय फाउंडेशनचे विद्यार्थीभिमुख उपक्रम जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात धनराज भगत यांनी बजावलेल्या निस्पृह भूमिकेबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. पुण्याच्या या ऐतिहासिक रंगमंचावर एका अभ्यासू पत्रकाराचा झालेला हा सत्कार संपूर्ण गोंदिया जिल्ह्यासाठी भूषणावह ठरला आहे. पत्रकारिता हे केवळ माहितीचे माध्यम नसून ते समाज परिवर्तनाचे शस्त्र आहे, हे धनराज भगत यांनी आपल्या लेखणीतून सिद्ध केले आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल वशिष्ठ खोब्रागडे, सुनील तुरकर, मुनेश्वर कुकडे, सतीश बघेले, रुपेश भंडारे, आर.व्ही. मेश्राम, डिलेश्वर पंधराम, सुबोध बैस, बाजीराव तरोणे, महेंद्र लिल्हारे, देवेंद्र रहांगडाले, सतीश पटले यांनी त्यांचे कौतुक करत विशेष अभिनंदन केले.