कमळी-ऋषीच्या नात्यात येणार नवा ट्विस्ट!

अनामिकाच्या एन्ट्रीमुळे घडणार मोठा बदल

    दिनांक :10-Apr-2026
Total Views |
मुंबई
Kamali कमळी सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. कथानकातील सतत येणारी मनोरंजक वळण, पात्रांमधील भावनिक गुंतागुंत आणि नात्यांतील चढ-उतार यामुळे ही मालिका अधिकच उत्कंठावर्धक बनत आहे. कमळी आणि ऋषी यांच्या नात्यातील नवीन घडामोडी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असतानाच, आता मालिकेत एका नव्या पात्राची एंट्री झाली आहे, जी त्यांच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणणार आहे. प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री आर्या आंबेकर यांची ‘अनामिका’ या भूमिकेतून मालिकेत विशेष एन्ट्री झाली आहे. अनामिका ही धाडसी, सकारात्मक आणि स्पष्टवक्ती मुलगी असून, तिच्या स्वभावामुळे कमळी आणि ऋषी यांच्या आयुष्यात एक नवा ट्विस्ट निर्माण होणार आहे.
 

Kamali