मुंबई
Konkan special train service उन्हाळी सुट्टी आणि कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची तसेच पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसआणि गोवा येथील मडगाव दरम्यान विशेष वातानुकूलित रेल्वे गाड्यांच्या चार फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे नियमित गाड्यांवरील वेटिंग लिस्टचा ताण कमी होऊन प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 01129 ही CSMT येथून 10 आणि 14 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्री 12:20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 3:15 वाजता मडगाव येथे पोहोचेल. तर परतीची गाडी क्रमांक 01130 मडगाव येथून 10 आणि 14 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 4:00 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 3:45 वाजता मुंबईत पोहोचणार आहे.या विशेष गाड्यांमध्ये पूर्णपणे वातानुकूलित व्यवस्था असणार असून 18 एसी 3-टियर इकॉनॉमी कोचेसचा समावेश असेल. प्रवाशांना तुलनेने कमी दरात आरामदायी प्रवास उपलब्ध व्हावा हा यामागील उद्देश आहे. तसेच गाडीमध्ये तांत्रिक आणि सुरक्षेच्या दृष्टीने दोन जनरेटर व्हॅनही जोडण्यात येणार आहेत.
कोकणातील प्रवाशांचा Konkan special train service अधिकाधिक फायदा व्हावा यासाठी या गाड्यांना एकूण 23 स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. मुंबईत दादर, ठाणे आणि पनवेल; रायगडमध्ये पेण, रोहा, माणगाव आणि वीर; रत्नागिरी जिल्ह्यात खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली आणि इतर स्थानके; तसेच सिंधुदुर्गातील कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि गोव्यातील थिविम व करमळी या स्थानकांचा यात समावेश आहे.या विशेष गाड्यांचे आरक्षण आधीच सुरू करण्यात आले असून प्रवाशांना तिकिटे IRCTC (IRCTC) संकेतस्थळ किंवा रेल्वे आरक्षण केंद्रांवरून बुक करता येणार आहेत. उन्हाळ्यातील वाढती मागणी लक्षात घेता या फेऱ्यांमुळे कोकण मार्गावरील प्रवास अधिक सुलभ होईल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.दरम्यान, प्रवाशांकडून आणि स्थानिक रेल्वे संघटनांकडून अशा विशेष गाड्या नियमित स्वरूपात वाढवण्याची मागणीही पुढे येत आहे.