- कुख्यात गुंड राजू भद्रेसह 6 आराेपी दाेषमुक्त
- बडकस चाैकातील काेट्यवधीचा भूखंड लाटल्याचे प्रकरण
अनिल कांबळे
नागपूर,
Land mafia Prakash Patil श्रीमंतांची वस्ती असलेल्या बडकस चाैकातील काेट्यवधी रूपयांची जमीन बळकावल्याप्रकरणी नागपुरातील कुख्यात भूमािफयाला सत्र न्यायाधीश वि.वि. मुंगलीकर यांनी तीन महिने सक्त मजुरीची शिक्षा ठाेठावली. याचप्रकरणातील अन्य आराेपी कुख्यात गुंड राजू भद्रे, माजी नगरसेवक अनिल धावडे यांच्यासह 6 आराेपींची निर्दाेष मुक्तता करण्यात आली आहे. प्रकाश पाटील (रा. इंदाेरा) असे शिक्षा झालेल्या आराेपी भूमाफियाचे नाव आहे.
Land mafia Prakash Patil सिंधू केशव इलमुलवार या शिक्षणाधिकारी पदावर कार्यरत हाेत्या. त्यांचा बडकस चाैकात माेठा वाडा आणि भूखंड हाेता. त्या अविवाहित हाेत्या आणि त्यांच्या मागे कुणीही वारस नव्हते. ही बाब कुख्यात गुंड राजू भद्रे, भूमाीया प्रकाश पाटील आणि नगरसेवक अनिल धावडे यांना कळली. त्यामुळे त्यांनी सिंधू यांच्या भूखंडावर नजर ठेवली. सिंधू यांचा 26 एप्रिल 2012 राेजी मृत्यू झाला. त्यामुळे ताे वाडा आणि भूखंड बेवारस पडला हाेता.कुख्यात राजू भद्रे, अनिल धावडे, प्रकाश पाटील, रविकांत खाेब्रागडे, जितेंद्र घाेसेकर, सय्यद नाझीम अली आणि राकेश घाेसेकर यांनी संगनमत करून त्या वाड्यावर अवैधरित्या ताबा मिळवला. आराेपींनी शासनाची दिशाभूल करीत सिंधू इलमुलवार यांच्या नावाने मुंबई येथे खाेटे दस्तऐवज आणि रजिस्ट्री तयार केली. त्याआधारे नागपूर सुधार प्रन्यास, महानगरपालिका आणि सिटी सर्वे येथे त्यांनी नाव नाेंदणीकृत केले. सिंधू इलमुलवार यांनी आराेपींसाेबत साैदा केला आहे, असे खाेटे विक्रीपत्र तयार करून त्यांचा वाडा आणि भूखंड फक्त 3 काेटी 60 लाख रुपयात नागपुरातील प्रतिष्ठित व्यावसायिक यांना नाेंदणीकृत विक्रीपत्र करून दिले. ही बाब काेतवाली पाेलिसांच्या लक्षात आल्याने तत्कालीन पाेलिस निरीक्षक खुशाल तिजारे यांनी गुन्हा दाखल करून सर्व आराेपींना अटक केली हाेती.
खाेटे रबरी शिक्के आणि राजकीय मुद्रा
पाेलिसांच्या तपासात आराेपींनी बनावट रबरी शिक्के, राजकीय मुद्रा, स्टॅम्प पेपर आणि रजिस्ट्रारच्या खाेट्या सह्या करून खाेटे विक्रीपत्र तयार केल्याचे निष्पन्न झाले. सबळ पुराव्यानिशी न्यायालयात दाेषराेपपत्र दाखल करून सर्व साक्षीदार तपासण्यात आले. त्यात प्रकाश पाटीलविराेधात गुन्हा सिध्द झाल्याने त्याला तीन महिने सक्त मजुरीची शिक्षा ठाेठावण्यात आली. उर्वरित आराेपींविरुद्ध गुन्हा सिध्द हाेऊ न शकल्यामुळे कुख्यात गुंड राजू भद्रे, अनिल धावडे, रविकांत खाेब्रागडे, जितेंद्र घाेसेकर, सय्यद नाझीम अली, आणि राकेश घाेसेकर यांना दाेषमुक्त केले. अॅड. मेश्राम, अॅड.माेगावकर यांनी न्यायालयात आराेपींची बाजू मांडली.