आयटी कंपनीतील ‘लव्ह, लिपस्टिक आणि बुरखा’

    दिनांक :10-Apr-2026
Total Views |
नाशिक
Nashik IT Company नाशिकच्या एका नामांकित बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत उघडकीस आलेले लैंगिक शोषण आणि धर्मांतराचे प्रकरण आता अधिक गडद होत चालले आहे. केवळ लैंगिक शोषणच नाही, तर तरुणींचे पद्धतशीरपणे ब्रेनवॉश करून त्यांचे धर्मांतर करण्याचा मोठा ’मास्टरगेम’ कंपनीत सुरू असल्याचे तपासात समोर आले आहे.
 
 
  nashik it company
Nashik IT Company तपासादरम्यान पीडित तरुणीच्या बाबतीत काही अत्यंत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. संशयित आरोपींनी पीडितेवर अशा प्रकारे प्रभाव टाकला होता की पीडितेने सलग दोन वर्षे महिना-महिनाभर उपवास पकडण्यास सुरुवात केली होती. हिंदू मैत्रिणींनी तिला जेवणासाठी बोलावले तरी ती स्पष्ट नकार देत असे. धक्कादायक म्हणजे, पीडितेने गेल्या वर्षापासून ’लिप्स्टिक’ लावणेही पूर्णपणे बंद केले होते. संशयित दानिश हा विवाहित असल्याचे पीडितेला तिच्या हिंदू टीम लीडरने अनेकदा सांगितले, तिची समजूत काढली. मात्र, संशयितांच्या जाळ्यात अडकलेल्या पीडितेला यावर विश्वासच बसत नव्हता.
‘विशिष्ट पोषाख छान दिसेल’
 
 
Nashik IT Company आरोपींची कार्यपद्धती अत्यंत नियोजनबद्ध होती. यामध्ये केवळ तरुणच नाही, तर काही विशिष्ट धर्मीय तरुणींचाही समावेश होता. या तरुणी हिंदू तरुणींशी जवळीक साधून, ‘तुला विशिष्ट धर्माचा पोषाख छान दिसेल, एकदा ट्राय करून तर बघ‘ असे सांगून त्यांना मानसिकरीत्या तयार करण्याचा प्रयत्न करत असत. वेळप्रसंगी यासाठी जबरदस्तीही केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
 
 
नऊ गुन्हे आणि एसआयटीचा तपास
 
 
Nashik IT Company या प्रकरणात आतापर्यंत नाशिकमध्ये एकूण नऊ गुन्हे दाखल झाले आहेत. देवळाली कॅम्प आणि मुंबई नाका पोलिस ठाण्यात आठ गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी आतापर्यंत सहा संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. ते सध्या एसआयटीच्या कोठडीत आहेत.
 
 
कंपनीची ‘एचआर’ पोलिसांच्या रडारवर
 
 
Nashik IT Company संशयितांवर गुन्हे दाखल होताच कंपनीची एचआर प्रमुख आश्विनी अशोक चैनानी ही पुण्यात पसार झाली होती. एसआयटीने तिला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. त्यानंतर तिला कायदेशीर नोटीस देऊन सध्या सोडण्यात आले आहे. या संपूर्ण रॅकेटमध्ये कंपनी प्रशासनातील वरिष्ठ पदाधिकाèयांचा किती सहभाग होता? याचा तपास आता पोलिस करत आहेत.