वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर
बुलडाणा,
Newspaper Sellers Association शासनाने जवळपास १४ महिने उलटूनही आश्वासन देऊनही वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ स्थापन केले नाही. सदर महामंडळाची प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. त्यामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये मोठी नाराजी व अस्वस्थता निर्माण झाली आहे. सदर वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ तत्काळ कार्यान्यवित करण्याची मागणी राज्यभरातील वृत्तपत्र विक्रेता तसेच बुलडाणा जिल्हा वृत्तपत्र संघटनेच्या वतीने जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्र्याकडे आज दि. ११ एप्रिल रोजी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
Newspaper Sellers Association महाराष्ट्र शासनाने उपरोक्त संदर्भानुसार वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी म्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा अत्यंत महत्वपूर्ण व ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयामुळे राज्यातीन हजारो कष्टकरी वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला होता. दि. ११ मार्च रोजी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात श्रीकांत भारतीय यांनी हा मुद्दा उपस्थित केला असता, माहिती व जनसंपर्क मंत्री आशिष शेलार यांनी पुढील अधिवेशनापूर्वी वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन दिले आहे. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना गेल्या पंधरा वर्षांपासून राज्यातील कष्टकरी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या हक्कांसाठी सातत्याने या विषयावर लढा देत आहे. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुमार तत्काळ शासन आदेश काढून स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळ लवकरात लवकर कार्यान्वित करावे, जेणेकरुन राज्यातील हजारो वृत्तपत्र विक्रेत्यांना सामाजिक सुरक्षा व न्याय मिळेल. राज्यातील वृत्तपत्र विक्रेते शासनाकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा ठेवून आहेत. तरी स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळ कार्यान्वित करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर, कार्याध्यक्ष बालाजी पवार,महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कोषाध्यक्ष तथा बुलडाणा जिल्हाध्यक्ष राजेंद्र टिकार,सरचिटणीस विकास सुर्यवंशी यांच्या लेखी निवेदनावर सह्या आहेत. निवेदन देतांना वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे पदाधिकारी रवींद्र चिंचोळकर, वैभव वाघमारे, सचिन निमकर्डे, माधव देशमुख, यादवराव हाके, जगदीश कोथळकर व राजेंद्र टिकार यांची उपस्थित होते.