प्लॅटफॉर्म तिकीट विक्री ५१ दिवसांसाठी बंद

    दिनांक :10-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Platform ticket मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाअंतर्गत नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर विकास कामे हाती घेण्यात आले आहे.त्यामुळे रेल्वे प्रशासनाने नागपूर रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री १०एप्रिल ते ३० मे असे एकूण ५१ दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. ही सुविधा तात्पुरती राहणार असून कॉन्कोर्स क्षेत्राचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पूर्ववत तिकीट विक्री सुरू केल्या जाणार आहे.
 
 
plessdk
 
Platform ticket  उन्हाळ्यातील वाढत्या प्रवासी गर्दीचा विचार करता रेल्वे प्रशासनाने नागपूर रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर ५१ दिवसांसाठी तात्पुरती निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, आवश्यक सोयीसाठी ज्येष्ठ नागरिक, आजारी प्रवासी, लहान मुले, अशिक्षित व्यक्ती तसेच काळजी घेऊ न शकणार्‍या महिला प्रवाशांसोबत येणार्‍या सहायक व्यक्तींना गरजेनुसार प्लॅटफॉर्म तिकीट देण्याची सुविधा राहील. ही उपाययोजना सुरू असलेल्या बांधकामा दरम्यान गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच प्रवाशांच्या सुरक्षितता आणि सोयीसाठी करण्यात आली आहे. प्रवाशांच्या माहितीसाठी ही सूचना स्थानक परिसरातील प्रमुख व दृश्यमान ठिकाणी हिंदी व मराठी भाषेत प्रदर्शित करण्यात येईल.