परदेशातून ‘हायड्रोपोनिक गांजा’ तस्करीचा भंडाफोड

    दिनांक :10-Apr-2026
Total Views |
पिंपरी-चिंचवड
Pune hydroponic ganja पुणे परिसरात परदेशातून उच्च प्रतीचा ‘हायड्रोपोनिक गांजा’ आणून त्याची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून, या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शहरात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांच्या जाळ्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
 

Pune hydroponic ganja 
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे विमानतळावर कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने संशयित प्रवाशावर नजर ठेवून ही कारवाई केली. संबंधित आरोपी बँकॉकहून पुण्यात दाखल झाला होता. तपासादरम्यान त्याच्या सामानाची तपासणी केली असता अत्यंत चलाखीने लपवून ठेवलेला ‘हायड्रोपोनिक गांजा’ जप्त करण्यात आला. हा गांजा विशेष प्रकारे पॅक करून कार्बन पेपरमध्ये गुंडाळण्यात आला होता, जेणेकरून स्कॅनिंगदरम्यान तो सहज लक्षात येऊ नये.
 
 
अधिकाऱ्यांनी सांगितले की, जप्त करण्यात Pune hydroponic ganja आलेल्या गांजाचे वजन सुमारे ९६० ग्रॅम असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल ३३ लाख रुपयांहून अधिक आहे. आरोपीला अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक करण्यात आली असून, तो मोठ्या तस्करी नेटवर्कचा भाग असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर, पुण्यात यापूर्वीही अशाच प्रकारच्या मोठ्या कारवाया झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच पुणे विमानतळावर तब्बल ७६ किलोहून अधिक ‘हायड्रोपोनिक गांजा’ जप्त करण्यात आला होता, ज्याची किंमत सुमारे २६ कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. हा माल थायलंडहून पाठवण्यात आला असल्याचे तपासात उघड झाले होते. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, ‘हायड्रोपोनिक गांजा’ हा अत्यंत उच्च प्रतीचा आणि महागडा अमली पदार्थ असून, तो प्रामुख्याने परदेशातून भारतात आणला जातो. यासाठी विमानतळाचा वापर करून विविध क्लृप्त्या वापरल्या जातात. अलीकडच्या काळात अशा प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने सुरक्षा यंत्रणांनी तपास अधिक कडक केला आहे.
या प्रकरणात आरोपीकडून आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू असून, त्याच्या संपर्कातील इतर साथीदारांचा शोध घेतला जात आहे. पुणे आणि परिसरात कार्यरत असलेल्या या तस्करी रॅकेटचा पूर्णपणे भंडाफोड करण्यासाठी संबंधित यंत्रणा तपास करत आहेत.दरम्यान, वाढत्या अमली पदार्थांच्या तस्करीमुळे युवकांमध्ये व्यसनाधीनतेचा धोका वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अशा प्रकरणांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.