- पाच सट्टेबाजांना अटक
नागपूर,
Raid on cricket bookies' hideout आयपीएलच्या सामन्यांवर सुरू असलेल्या लगवाडी-खायवाडीच्या रॅकेटचा पाेलिसांनी भंडााेड केला आहे. बेलतराेडी पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील मनीषनगरातील एका फफ्लॅटमधून हा प्रकार चालविल्या जात हाेता. पाेलिसांनी पाच आराेपींना ताब्यात घेतले असून त्यात यवतमाळच्या पंटर्सचादेखील समावेश आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाने ही कारवाई केली.
Raid on cricket bookies' hideout सूरज उमेश राॅय (26, शास्त्री वाॅर्ड, पांढरकवडा, यवतमाळ), सागर धनराज शिवहरे (35, टेकऑफ सिटी, बहादुरा), जितेंद्र शंकरराव खंते (30, शक्तीमातानगर, खरबी मार्ग), सुमित सुभाष राॅय (34, पार्वतीनगर, अजनी) व विक्की गणेश जयस्वाल (37, श्यामधाम साेसायटी, मनीषनगर) अशी आराेपींची नावे आहेत. गुरुवारी खबèयांच्या माहितीवरून गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक महेश सागडे यांनी पाेलिसांनी बेलतराेडी पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील मनीषनगरातील भारतीय साेसायटीमधील पार्क व्ह्यू रेसीडेन्सी येथे धाड टाकली. तेथे आराेपी काेलकाता विरुद्ध लखनाैदरम्यान सुरू असलेल्या सामन्यावर माेबाइलद्वारे लगवाडी-खायवाडी करताना आढळले. आराेपी टॅबच्या माध्यमातून ग्राहकांकडून पैसे स्वीकारत हाेते. आराेपींच्या ताब्यातून टॅब, 10 माेबाइल, दाेन दुचाकी व कार असा 11.84 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सर्व आराेपींविराेधात गुन्हा दाखल करत त्यांना बेलतराेडी पाेलिस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे.