राज्यातील रस्ते अपघात घट:वाहतूक पाेलिस कर्मचाऱ्यांना यशाचे श्रेय

- पाेलिस आयुक्तांच्या हस्ते अंमलदारांचा सत्कार

    दिनांक :10-Apr-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
reduction in road accidents राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी रस्ते अपघातात माेठी घट झाली आहे. रस्ते अपघातात मृत्यू पावणाऱ्यांची संख्या आणि जखमी हाेणाऱ्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळाले आहे. या सर्व सकारात्मक बाबींचे श्रेय पाेलिस आयुक्त डाॅ. रवींद्रकुमार सिंगल यांनी वाहतूक पाेलिसांनी घेतलेल्या अहाेरात्र परिश्रमाला दिले आहे. रस्ते अपघात कमी हाेण्यासाठी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पाेलिस कर्मचाऱ्यांचा आयुक्तांनी सत्कार केला. त्यांना सन्मानचिन्ह देऊन गाैरव केला.
 


रस्ते अपघात  
 
नागपूर पाेलिसांनी राबवलेल्या ‘स्मार्ट ट्रॅिफक पाेलिस’ उपक्रम आणि ‘ऑपरेशन यू-टर्न’ सारख्या अभियानाची कठाेर अंमलबजावणीमुळे अपघातांच्या प्रमाणात ही घट दिसून आली आहे. विशेषतः जड वाहनांना शहरात प्रवेशबंदी घातल्याने अपघातांवर नियंत्रण मिळवण्यास मदत झाली आहे. वर्ष 2025 यामध्ये नागपूर शहरातील रस्ते अपघातांमध्ये लक्षणीय घट नाेंदवण्यात आली आहे. तसेच गेल्या तीन महिन्यांची आकडेवारी लक्षात घेता अपघातात बरीच माेठी घट झाल्याची दिसते. या कार्याचे काैतूक म्हणून रस्ते अपघातात घट आणण्यासाठी कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पाेलिस कर्मचाऱ्यांचा सत्कार पाेलिस आयुक्तांनी केली आहे. त्यांनी प्रशस्तीपत्र देऊन अंमलदारांचा गाैरव करण्यात आला. यावेळी पाेलिस आयुक्तांसह पाेलिस सहआयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पाेलिस उपायुक्त लाेहित मतानी, सहायक पाेलिस आयुक्त महेश ठाकूर आणि अन्य पाेलिस अधिकारी उपस्थित हाेते. अंमलदारांमध्ये निलेश वानखडे, प्रुल्ल बाेंदरे, सुनील काेळेकर, काेल्हे, बारई, राठाेड, तिवारी, साेलव, प्रीती भीवगडे, नरेश ठवरे, नान्हे, रवीकांत काठे, छत्रपाल सातपूते यांच्यासह 25 अंमलदारांचा सत्कार करण्यात आला.
 
पाेलिसांची अधाेरेखित कामगिरी
2025 मध्ये नागपूर शहरात एकूण 1,059 रस्ते अपघातांची नाेंद झाली असून रस्ते अपघातातील मृत्यूंच्या संख्येत सुमारे 21 ते 24.38 घट झाली आहे. 2024 मधील 316 मृत्यूंच्या तुलनेत 2025 मध्ये ही संख्या 245 ते 250 पर्यंत खाली आली आहे. अपघातात जखमी हाेणाèयांच्या संख्येतही 10 टक्के घट हाेऊन ती 1,045 वर आली आहे. जवळपास 44 टक्के गंभीर अपघात हे बेदरकारपणे किंवा निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे झाले आहेत. वाहतूक पाेलिसांनी सकारात्मकपणे अभियान राबविल्यामुळे अपघातासह अन्य घटनांमध्ये घट झाली आहे.