इंधनाच्या तुटवड्याच्या अफवा खोट्या! सरकारचा मोठा खुलासा

    दिनांक :10-Apr-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Rumors of fuel shortage are false देशातील इंधन उपलब्धतेबाबत केंद्र सरकारने नागरिकांना दिलासा देणारी माहिती जाहीर केली आहे. जागतिक पातळीवरील अस्थिर परिस्थिती असूनही पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन इंधनाचा साठा करण्याची गरज नसल्याचा सल्लाही देण्यात आला आहे. अलीकडील आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त होत असताना सरकारने आधीच आवश्यक पावले उचलली आहेत. देशातील गरज लक्षात घेऊन घरगुती गॅस आणि पाईपद्वारे दिल्या जाणाऱ्या वायूला प्राधान्य दिले जात आहे. रुग्णालये तसेच शैक्षणिक संस्थांना इंधनाचा पुरवठा कोणत्याही परिस्थितीत खंडित होणार नाही, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
 
shortage are false
 
पुरवठा आणि मागणी यामधील समतोल राखण्यासाठीही काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. रिफायनरीमधील उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात आला असून गॅस बुकिंगच्या कालावधीतही वाढ करण्यात आली आहे. शहरांमध्ये हा कालावधी वाढवण्यात आला असून ग्रामीण भागातही वितरणाची वेळ वाढवून पुरवठा साखळीवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.घरगुती गॅसवरील दबाव कमी करण्यासाठी पर्यायी ऊर्जास्रोतांचा वापर वाढवण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. रॉकेल आणि कोळसा यांसारख्या पर्यायांचा पुरवठा वाढवण्यासाठी संबंधित यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नवीन गॅस जोडणी मिळवण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्याचे निर्देश राज्य प्रशासनांना देण्यात आले आहेत.
गॅसचा कोणताही तुटवडा नाही
ग्राहकांना अधिक सोयीस्कर सेवा मिळाव्यात यासाठी तंत्रज्ञानाचा वापरही मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आला आहे. देशभरातील बहुतांश गॅस बुकिंग आता डिजिटल पद्धतीने होत असून वितरणाच्या वेळी ओळख पडताळणीची यंत्रणा वापरून गैरप्रकारांना आळा घालण्यात येत आहे.सरकारने दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या गॅसचा कोणताही तुटवडा नाही. नुकत्याच एका दिवशी लाखो घरगुती सिलिंडरचा पुरवठा करण्यात आल्याने परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही अफवा किंवा भीती न बाळगता शांत राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.