बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणाऱ्यांशी हातमिळवणी नाहीच!

शहा यांनी ममता बॅनर्जी सरकारवर टीका

    दिनांक :10-Apr-2026
Total Views |
कोलकाता,
Shah criticizes Mamata Banerjee कोलकाता येथे भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्याच्या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगाल सरकार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. त्यांनी म्हटले की, भारतीय जनता पक्ष आणखी वीस वर्षे विरोधी पक्षात बसण्याची वेळ आली तरी स्वीकारेल, परंतु बंगालमध्ये वादग्रस्त धार्मिक बांधकामाच्या समर्थन करणाऱ्यांशी कधीही हातमिळवणी करणार नाही. या कार्यक्रमादरम्यान शहा यांनी आरोप आणि राजकीय चर्चांचा संदर्भ देत राज्यातील परिस्थितीवर भाष्य केले. त्यांनी असेही सांगितले की, काही व्यक्तींशी कोणत्याही प्रकारची राजकीय जवळीक साधणे शक्य नाही, कारण दोन्ही बाजू पूर्णपणे विरुद्ध विचारसरणीच्या आहेत. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वातावरणात पुन्हा एकदा तीव्र चर्चा सुरू झाली आहे.
 
 
Shah criticizes Mamata Banerjee
 
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक कथित ध्वनीचित्रफीत समोर आली आहे, ज्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांकडून ती सार्वजनिक करण्यात आली असून त्यात एका नेत्याने आर्थिक व्यवहार आणि राजकीय रणनीतीबाबत चर्चा केल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणावर संबंधित व्यक्तीने हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावत ही ध्वनीचित्रफीत खोटी आणि राजकीय हेतूने तयार करण्यात आलेली असल्याचे म्हटले आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर काही राजकीय आघाड्यांमध्येही बदल झाले असून विविध पक्षांमधील संबंध तुटल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, पूर्वीच्या एका वादग्रस्त घटनेनंतर संबंधित नेत्यावर पक्षातून कारवाई झाल्याचेही सांगितले जात आहे. संपूर्ण प्रकरणामुळे पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण अधिक तापले आहे.