अनिल कांबळे
नागपूर,
smuggling of md powder इमामवाडा परिसरात अमली पदार्थांची तस्करी करणाèया आराेपीला गुन्हे शाखेने अटक केली. या कारवाईत पाेलिसांनी आराेपीकडून एमडीसह 12 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. प्रदीप पुरणदास उईके (33, कुंभारटाेली, धंताेली) असे आराेपीचे नाव आहे.

गुन्हे शाखेचे अमली पदार्थ विराेधी पथक इमामवाडा हद्दीत बुधवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान गस्त घालत हाेते. यावेळी इमामवाडा सिमेंट राेडवरील प्राईम पेन्टसब अॅन्ड हार्डवेअर समाेर एक कार (एमएच 02 सीडब्ल्यू 1604) संशयास्पद स्थितीत दिसून आली. पाेलिसांनी कारचालकाला थांबवून त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे 6 ग्रॅम एम.डी. पावडर मिळून आली. चाैकशीदरम्यान, त्याने ही एम.डी.पावडर साथिदारांच्या मदतीने विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली.smuggling of md powder पाेलिसांनी त्याच्याकडून एमडी पावडर, 3 माेबाईल आणि कार असा 12 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आराेपी प्रदीप उईके याने या गुन्ह्यात त्याचे साथीदार आकाश शिवकुमार गुप्ता (मरीयमनगर) आणि कार्तिक प्रकाश सातपुते (22, पाचपावली) यांची नावे सांगितली. या प्रकरणी पाेलिसांनी आराेपीविरूद्ध गुन्हा दाखल करीत प्रदीप उईकेला अटक करण्यात केली. पाेलिस फरार साथीदारांचा घेत आहेत.
...........