सर्व शासकीय वसतीगृहाच्या इमारती या शासकीय असाव्या : ना. शिरसाट

    दिनांक :10-Apr-2026
Total Views |
वर्धा, 
सामाजिक न्याय विभागामार्फत सुरू असलेल्या सर्व शासकीय वसतीगृहाच्या इमारती या शासकीय असाव्या. ज्या वसतीगृहाच्या इमारती खाजगी इमारतीत भाडेतत्त्वावर आहेत अशाकरिता तात्काळ जागा उपलब्ध करुन तसेच जीर्ण झालेल्या इमारतीच्या नवीन बांधकामाकरिता प्रस्ताव सादर करा, असे निर्देश आढावा बैठकीत Social Justice Minister Sanjay Shirsat सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दिले.
 
 
skhirsat
 
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज १० रोजी समाज कल्याण विभागाच्या कामकाजाचा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, अपर जिल्हाधिकारी संजय तेली, समाज कल्याण नागपूर विभागाचे उपायुत प्रसाद कुळकर्णी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष दत्तप्रसाद नडे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य तथा उपायुत जया राऊत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठाण नागपूरचे व्यवस्थापकीय संचालक सुरेंद्र पवार, समाज कल्याण सहाय्यक आयुत अंकेश केदार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रतिभा भागवतकर आदींची उपस्थिती होती.
 
 
ते पुढे म्हणाले की, सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा दुसरा टप्पा राबविला जाणार आहे. लाभार्थ्याना या योजनेचा लाभ मिळून देण्यासाठी प्रभावी नियोजन करावे. नागपूर, संभाजीनगर व मुंबई येथून मे महिना अखेरीस विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहे. किमान ८०० लार्भार्थ्यांचे नियोजन वर्धा जिल्ह्याने करावे असे ते म्हणाले. बर्‍याच शाळांत शिक्षकांची कमतरता आहे. रोबोटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची योजना राबविण्याचे शासनाने निश्चित केले आहे. यासाठी प्रायोगिक तत्त्वावर नागपूर येथे हा उपक्रम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचेही Social Justice Minister Sanjay Shirsat  शिरसाट म्हणाले.
 
 
मुलींचे झाले आता मुलांसाठी वसतीगृह
मागासवर्गीय मुलींसाठीच्या वसतिगृह बांधकामाचा भुमिपूजन झालेे. कार्यरत २ वसतीगृहे ७५-७५ क्षमतेची आहे. तर नवीन वसतीगृहांमुळे विद्यार्थिनी क्षमता ५०० होणार आहे. नवीन वसतिगृहांमुळे ज्या प्रमाणे मुलींसाठी वसतीगृहांची क्षमता वाढणार त्याच प्रमाणे मुलांसाठीच्या नवीन वसतीगृहांचा प्रस्ताव सादर करावा, असे ना. सिरसाट यांनी केले. याप्रसंगी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, अपर जिल्हाधिकारी संजय तेली, समाज कल्याण नागपूर विभागाचे उपायुत प्रसाद कुळकर्णी, नगराध्यक्ष सुधीर पांगूळ, विजय आगलावे, आदींची उपस्थिती होती.