आत्महत्येच्या प्रयत्नातील युवतीचा वाचवला जीव

    दिनांक :10-Apr-2026
Total Views |
- अजनी रेल्वे पुलावरुन उडी मारण्याच्या हाेती तयारीत
 
अनिल कांबळे
नागपूर, 
Suicide attempts अजनी रेल्वे पुलावर नेहमीप्रमाणे वाहनांची गर्दी. एक तरुणी तेथून पायी जात हाेती. अचानक तिचे कुणाशीतरी फोनवर बाेलणे झाले. ती लगेच उड्डानपुलावर चढली. तेथून ती उडी मारणारच तर एका युवकाला ती दिसली. त्याने लगेच झडप घालत त्या तरुणीला पकडले. तिला पुलाखाली उतरवले आणि तिची समजूत घातली. त्यानंतर दाेघेही तेथून निघून गेले. एवढी माेठी गंभीर घटनेबाबत माहिती घेण्यासाठी धंताेलीचे ठाणेदार साईनाथ रामाेड यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही, हे विशेष. सूत्रांच्या माहितीनुसार, अंदाजे 22 ते 24 वर्षीय तरुणी अजनी रेल्वे पुलाच्या कठड्यावर बसून खाली उडी मारण्याच्या तयारीत हाेती.
 
 
girl
 
Suicide attempts  पुलाच्या खाली धावणाऱ्या  रेल्वे गाड्या आणि वरून सुरू असलेली वाहनांची वर्दळ यामुळे परिस्थिती अत्यंत धाेकादायक बनली हाेती. काेणत्याही क्षणी माेठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली हाेती. दरम्यान, परिसरात उपस्थित असलेल्या काही युवकांच्या लक्षात ही बाब आली. परिस्थितीची गंभीरता ओळखत त्या युवकांपैकी एकाने अत्यंत धाडस दाखवत मागून जाऊन त्या तरुणीला घट्ट पकडले. अचानक घडलेल्या या हालचालीमुळे तरुणीचा ताेल जाऊ नये, याची काळजी घेत तिला सुरक्षितपणे पुलाच्या भिंतीवरून खाली उतरवण्यात आले. या युवकाच्या या कृतीमुळे एक संभाव्य माेठी दुर्घटना टळली असून उपस्थितांनी सुटकेचा निश्वास साेडला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ काही क्षणांतच साेशल मीडियावर व्हायरल झाला आणि संबंधित युवकाचे सर्वत्र काैतुक हाेत आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत धंताेली पाेलिसांनी या घटनेमधील तरुणी आणि तरुणाबाबत काेणतीही माहिती मिळाली नव्हती. तसेच ठाणेदार रामाेडसुद्धा या घटनेची माहिती देण्याबाबत रस दाखवत नव्हते, अशी माहिती समाेर आली आहे.