पतीसह चार जणांवर गुन्हे दाखल
अनिल कांबळे
नागपूर,
Suicide of married woman माहेरून पैसे आणण्यासाठी सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केली. सासरच्या चार लाेकांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेशपेठ पाेलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. सना अंजुम अकील खान उफर् सना अंजुम शेख (वय 26, गंजीपेठ) असे मृतक महिलेचे नाव आहे. तर तिचा पती शाेएब उफर् सैफ आयुब खान (वय 30), सासरा नसीम आयुब खान (वय 57), सासू व नणंद समीना उफर् साेनी अनिस खान (वय 35, गणेशपेठ) अशी आराेपींची नावे आहेत.
Suicide of married woman सना व शाेएबचे 2024 मध्ये लग्न झाले हाेते. लग्नानंतर सासरचे लाेक सनाला सातत्याने माहेरून पैसे आणण्यासाठी त्रास देत हाेते. त्यांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. तिला राेज मारहाण करण्यात येत हाेती तर सासू-सासरे नेहमी टाेमणे मारुन तिला छळत हाेते. नणंद तिला शिवीगाळ करुन मारहाण करीत हाेती. या सर्व प्रकाराला कंटाळून सनाने 7 एप्रिल राेजी सायंकाळी पाच वाजता घराच्या छताला ओढणीने गळास घेत आत्महत्या केली. या प्रकरणात पाेलिसांनी अगाेदर अकस्मात मृत्यूची नाेंद केली हाेती. मात्र, चाैकशीदरम्यान आराेपींनी तिचा छळ केल्याची बाब समाेर आली. पाेलिसांनी सर्व आराेपींविराेधात गुन्हा दाखल केला आहे.