- गोंदिया ते रक्सौलदरम्यान २५ एप्रिलपासून साप्ताहिक रेल्वेगाडी
गोंदिया,
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने गोंदिया ते रक्सौल दरम्यान 'Summer Special Train' ‘समर स्पेशल’ साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना, विशेषतः कामगार आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
'Summer Special Train' उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये प्रवाशांची गर्दी पाहता २५ एप्रिल ते २८ जून या कालावधीसाठी ०८८६७ व ०८८६८ गोंदिया-रक्सौल-गोंदिया या विशेष साप्ताहिक रेल्वेगाडीचे प्रत्येकी १० फेर्यांसाठी परिचालन करण्यात येणार आहे. यात रेल्वेगाडी क्रमांक ०८८६७ (गोंदिया ते रक्सौल) २५ एप्रिल ते २७ जून या कालावधीत धावणार असून २५ एप्रिल रोजी सकाळी ६.३० वाजता गोंदिया स्थानकावरून सुटेल. ही गाडी डोंगरगड, राजनांदगाव, दुर्ग, रायपूर, भाटापारा, बिलासपूर, चांपा, रायगड, झारसुगुडा, राऊरकेला, रांची, बोकारो स्टील सिटी, चंद्रपुरा जंक्शन, धनबाद जंक्शन, चित्तरंजन, मधुपूर जंक्शन, जसीडीह, झाझा, किऊल जंक्शन, बरौनी जंक्शन, समस्तीपूर जंक्शन, दरभंगा जंक्शन आणि सीतामढी जंक्शन होत दुसर्या दिवशी सायंकाळी ५ वाजता रक्सौल स्थानकावर पोहोचेल. तर रेल्वेगाडी क्रमांक ०८८६८ ही गाडी २६ एप्रिल ते २८ जून कालावधीत धावणार असून २६ एप्रिल रोजी सायंकाळी ७.१० वाजता रक्सौल स्थानकावरून सुटेल. ही गाडी परतीच्या प्रवासात वरील स्थानकांवरून धावत दुसर्या दिवशी सकाळी ७ वाजता गोंदिया रेल्वे स्थान गाठणार आहे. या रेल्वेगाडीत २ एसएलआरडी, ४ सामान्य, १० शयनयान व ३ एसीचे ४ कोच देण्यात आले आहे. या विशेष गाडीमुळे उन्हाळ्यात नियमित गाड्यांमध्ये असलेल्या वेटिंग लिस्टपासून प्रवाशांना सुटका मिळणार असून नियमित गाड्यांवरील भारही कमी होईल. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.