अमराठी प्रेक्षकही वळाले 'सुपर डुपर' चित्रपटाकडे

    दिनांक :10-Apr-2026
Total Views |
मुंबई,
Super Duper movie Marathi सध्या चित्रपटगृहांमध्ये ‘सुपर डुपर’ या चित्रपटाची जबरदस्त चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. कथानकाची ताकद, कलाकारांची प्रभावी कामगिरी आणि मनाला भिडणारी मांडणी यामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. विशेष म्हणजे, बॉलिवूडचे मोठे चित्रपट स्पर्धेत असतानाही प्रेक्षकांनी ‘सुपर डुपर’ला प्राधान्य दिले, ही बाब या चित्रपटाच्या यशाची साक्ष देणारी ठरते
 

Super Duper movie Marathi, 
चित्रपट पाहिल्यानंतर अनेक प्रेक्षकांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे “आजकाल सगळे जण वेगवेगळ्या गोष्टींमध्ये व्यस्त असतात, परंतु ‘सुपर डुपर’ हा असा चित्रपट आहे जो तिन्ही पिढ्या एकत्र बसून आनंदाने पाहू शकतात.” कुटुंबातील प्रत्येक सदस्याला जोडणारा, हसवणारा आणि भावूक करणारा हा चित्रपट असल्यामुळे चित्रपटगृहात कौटुंबिक प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांसह समीक्षकही या चित्रपटाचे कौतुक करत आहेत.
फक्त मराठी प्रेक्षकच Super Duper movie Marathi नाही, तर अमराठी प्रेक्षकही या चित्रपटाकडे आकर्षित होत असून, भाषेच्या पलीकडे जाऊन ‘सुपर डुपर’ची कथा सर्वांच्या मनात घर करत आहे. चित्रपटातील प्रसंग, संवाद आणि संगीत यामुळे प्रेक्षकांचा अनुभव अधिक समृद्ध होत असल्याचेही अनेकांनी नमूद केले आहे.