चेन्नई,
Thalapathy Vijay दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार थलपती विजय सध्या राजकारण आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अलीकडेच त्याने तामिळनाडूमधील एका सार्वजनिक सभेत भाषण करताना त्याच्या विरोधात कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप केला. विशेष म्हणजे, या सभेत त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील चर्चांवरही पहिल्यांदाच उघडपणे प्रतिक्रिया दिली. गेल्या काही दिवसांपासून विजय आणि त्याची पत्नी संगीता सोर्नालिंगम यांच्यातील मतभेद आणि घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. याच पार्श्वभूमीवर विजयने सभेत बोलताना या चर्चांना राजकीय रंग देत, विरोधकांवर टीका केली.
विजय म्हणाला की, निवडणुकीच्या तोंडावर त्याची प्रतिमा खराब करण्यासाठी काहीजण मुद्दाम अफवा पसरवत आहेत. “काही लोक माझ्याविरोधात कट रचत आहेत. Thalapathy Vijay अनेक वर्षे थांबून त्यांनी योग्य वेळ साधत या गोष्टी पुढे आणल्या. मात्र जनतेचा माझ्यावर विश्वास आहे आणि अशा अफवांचा त्यांच्यावर कोणताही परिणाम होणार नाही,” असे त्याने ठामपणे सांगितले. विजयने स्पष्ट केले की, “मला जनतेपासून दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण माझा लोकांशी असलेला संबंध इतका मजबूत आहे की, तो कोणीही तोडू शकत नाही.” त्याच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळातही चर्चा रंगल्या आहेत.